शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींच्या उपसूचनांवरून भाजपमध्ये कुरघोड्यांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:41 IST

- महेश लांडगे गटाविरुद्ध निष्ठावंत आणि शंकर जगताप गट; विरोधी नगरसेवकांच्याही ‘सह्या कोणी करवून घेतल्या?’ याची उत्सुकता; राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांच्या सह्यांनी गूढ वाढले

पिंपरी : महापालिकेतील ५२ कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरणात सत्ताधारी भाजपमधील गटबाजीतून सुरू झालेल्या कुरघोड्या, विरोधकांतील संभ्रम आणि पडद्याआडच्या राजकीय सूत्रधारांचा शोध असा खेळ रंगला आहे. भाजपमध्ये आमदार महेश लांडगे गटातील सत्तारूढ पक्षनेते आणि शहराध्यक्ष विरुद्ध निष्ठावंत व आमदार शंकर जगताप गटातील नेते असा संघर्ष समोर आला आहे.

उपसूचनांवर अनुमोदक आणि सूचक म्हणून सह्या केलेले भाजपचे नगरसेवक खासगीत ‘सरांनी सांगितले म्हणून सह्या केल्या’, असे सांगत असल्याने, सह्या करणाऱ्यांपेक्षा त्या करवून घेणारे ‘सर’ चर्चेत आले आहेत. भाजपमध्येच एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकरणातून आमदार लांडगे गटातील नेत्यांपैकी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या विरोधात भाजपमधील निष्ठावंत व आमदार शंकर जगताप गटातील नेते असा सुप्त संघर्ष दिसत आहे. दोन्ही गटांची भूमिका परस्परविरोधी आहेत. कोणाचा राजकीय काटा काढण्यासाठी हा मुद्दा वापरला जात आहे, यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या सह्या ?

या प्रकरणास वेगळे वळण लागले असून, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या दोन नगरसेवकांच्या सह्याही या उपसूचनांवर असल्याचे पुढे आले आहे. त्यातील एक नगरसेवक भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले, तर दुसरे शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले असल्याने, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून सह्या केल्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नगरसेवकांच्या सह्यांबाबत विरोधी पक्षनेत्यांनाही माहिती नव्हती. विरोधी बाकांवरील सदस्यांकडून सह्या करवून घेणारे राजकीय सूत्रधार आता विरोधी पक्षनेत्यांवर वरचढ झाल्याचे दिसत आहे.आमदारांचे मौन, नगरसेवकांवर कारवाई होणार का ?

आमदार अमित गोरखे व उमा खापरे वगळता महापालिकेच्या प्रत्येक विकासकामांचे श्रेय घेणारे भाजपचे दोन्ही आमदार यावर मौन बाळगून असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रकरण तापत असताना आमदारांनी स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने, कारवाईचा बडगा केवळ अधिकाऱ्यांपुरता मर्यादित राहणार की सह्या करणाऱ्या नगरसेवकांपर्यंतही पोहोचणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad BJP faces infighting over 52 crore bogus sub-proposals.

Web Summary : Pimpri-Chinchwad BJP is embroiled in infighting over 52 crore rupee bogus sub-proposals. The internal power struggle involves accusations, suspicion, and silence from key figures, raising questions about potential action against corporators.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahesh landgeमहेश लांडगेBJPभाजपा