तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला आंद्रा धरण येथून घरगुती (पिण्याच्या) वापरासाठी ५.०१४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर २०४८ पर्यंतचा विचार करून घेतलेला हा निर्णय शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरणार आहे. यापूर्वी इंद्रायणी व पवना नदीतून काही प्रमाणात पाणी आरक्षण असले तरी, वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही अतिरिक्त मंजुरी देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.या निर्णयामागे आमदार सुनील शेळके यांचा पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. धरणातून पाणी आणण्याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करत शासनस्तरावर विषय लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, तळेगाव शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.पाणी न उचलल्यास आरक्षण रद्द
शासनाने या पाणी आरक्षणास काही अटी व शर्ती लागू केल्या असून, पाणी वापरासाठी आवश्यक करारनामे, नियोजनबद्ध वितरण व्यवस्था, जलप्रदूषण नियंत्रण आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक राहणार आहे. मंजूर आरक्षणानुसार प्रत्यक्ष पाणी उचल सुरू न झाल्यास आरक्षण रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
Web Summary : Talegaon Dabhade secured 5.014 MCM water reservation from Andra Dam for drinking. This decision, driven by MLA Sunil Shelke's efforts, addresses long-term water scarcity, ensuring a stable water supply until 2048. Conditions apply; failure to utilize water may lead to cancellation.
Web Summary : तलेगांव दाभाड़े को आंद्रा बांध से पीने के लिए 5.014 एमसीएम पानी का आरक्षण मिला। विधायक सुनील शेल्के के प्रयासों से यह निर्णय लिया गया, जो दीर्घकालिक जल संकट को दूर करता है, और 2048 तक स्थिर जल आपूर्ति सुनिश्चित करता है। शर्तें लागू; पानी का उपयोग करने में विफलता से आरक्षण रद्द हो सकता है।