शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-Chinchwad : महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:00 IST

- मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आग्रह; पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद; काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सूतोवाच

पिंपरी : महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सवतासुभा मांडला आहे. याबाबत गुरुवारी (दि. ६) मुंबईतील वरळीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत शहरातील नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वबळासह काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल, असेही सूचित केले.

राज्यात नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक मुंबईत सायंकाळी झाली. शहरातील पदाधिकाऱ्यांना तासाभराचा वेळ देण्यात आला होता. यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

स्थानिक नेत्यांनी आपापली मते मांडली. त्यानंतर पवार यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊ. निवडणुकीसाठी मतदार याद्या पाहून घ्या, तयारी करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. शहराची नवीन कार्यकारिणी लवकर जाहीर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

स्वबळावरच लढले पाहिजे : नेत्यांची मागणीसुरुवातीला शहरातील निवडणुकीबाबत पवार यांनी आढावा घेतला. स्थानिक नेत्यांनी शहरातील पक्षाची परिस्थिती सांगितली. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा सत्ता पुन्हा हातातून जाईल, असे सर्वच नेत्यांनी सांगितले. भाजप किंवा शिवसेनेबरोबर युती करू नये. युती केल्यास आपल्या उमेदवारावर अन्याय होईल, असे शहरातील नेत्यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

कोण कोणाचा पत्ता कट करणार नाही अजित पवार म्हणाले की, महापालिका निवडणुकीची स्थानिक पातळीवरील पार्श्वभूमी पाहता, ही निवडणूक स्वबळावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. पिंपरी-चिंचवडमध्ये आपण खूप काम केले आहे. २०१७ चा अपवाद वगळता शहरात वर्चस्व राहिले आहे. आता ते कायम राखावे. इतर पक्षांमध्ये दिल्लीला विचारावे लागते. मात्र, आपल्याकडे असे नाही. मागील वेळी काम केले नाही म्हणून कोण कोणाचा पत्ता कट करेल, असे काही होणार नाही, माझे थेट लक्ष असेल. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpari-Chinchwad: Ajit Pawar faction prepares to contest municipal elections independently.

Web Summary : Ajit Pawar's faction in Pimpari-Chinchwad is preparing to contest municipal elections independently. Leaders emphasized contesting alone to retain control, fearing alliance compromises. Pawar acknowledged the demand, suggesting both independent and friendly contests might be necessary, promising direct oversight and no unjust candidate removals.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र