शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत ‘डेथ ट्रॅप’चा बळी..! केबलने घेतला महिलेचा जीव; प्रशासन कारवाई कधी करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:51 IST

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट केबलचे जीवघेणे जाळे पसरले

पिंपरी : शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट केबलचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. सेक्टर २६ परिसरात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘डेथ ट्रॅप’ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?, असा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट केबलचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. सोमवारी वाय-फाय केबल गळ्यात अडकून संपदा पटवर्धन यांचा मृत्यू झाला.

याबाबत पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला गोरखे यांनी पत्र दिले आहे. याबाबत आमदार अमित गोरखे म्हणाले, पटवर्धन यांचा झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नसून प्रशासकीय अनास्था आणि संबंधित कंपन्यांचा निष्काळजीपणा यामुळे झालेली ‘हत्या’ आहे. प्रबोधन सोसायटीमधील पटवर्धन या ज्ञानप्रबोधिनी शाळेतून घरी परतत होत्या. शीतछाया परिसरात रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबलमुळे मृत्यू झाला. ४-५ फूट उंचीवर मृत्यूचे सापळे सोडून देणाऱ्या संबंधित इंटरनेट, वाय-फाय सेवा पुरवठादार कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी. 

आर्थिक मदत द्यावी

मृत व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी. तसेच संपूर्ण शहरातील, विशेषतः अंतर्गत रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या आणि धोकादायक केबल्स २४ तासांच्या आत हटवण्यात याव्यात. ज्या कंपनीची ती केबल होती, त्या कंपनीचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. पावसाळा तोंडावर असताना अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि बेदरकार वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने आवश्यक तिथे दर्जेदार स्पीड ब्रेकर बसवावेत, अशीही मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri: Woman Dies Trapped by Cable; Action Demanded!

Web Summary : A woman died in Pimpri after getting entangled in a loose WiFi cable. Local MLA demands action against negligent cable companies and financial aid for the victim's family. He also urged removal of dangerous cables and installation of speed breakers.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड