शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीत पुन्हा एकदा हादरा,महिन्याभरातच दुसरा नगरसेवक गमावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 20:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांचे निधन..

ठळक मुद्देशेख यांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर दुसरी निगेटिव्ह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आकुर्डी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख (वय ५९) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. महिनाभरात कोरोनामुळे नगरसेवकांचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शेख यांचे निधन झाल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.       आकुर्डी प्रभागातून जावेद शेख सलग तीन वेळा ते निवडून आले होते. २००७ च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत  राष्ट्रवादीकडून शेख यांनी निवडणूक लढविली होती. त्यातही विजयी झाले. तसेच ‘अ’ प्रभागाचे अध्यक्षपदही भूषविले होते.  शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. उपचारादरम्यान त्यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. महिनाभरापूर्वी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच दुसऱ्या नगरसेवकाचा मृत्यू झाल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.डॉ. पवन साळवे म्हणाले, जावेद शेख यांचा कोरोना अहवाल १५ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दखल केले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शेख यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली असता ३० जुलैला अहवाल निगेटिव्ह आला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस