पिंपरीत सुऱ्याच्या धाकाने दुचाकीसह, मोबाईल जबरदस्तीने लुटला; तिघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:24 IST2021-07-20T18:24:36+5:302021-07-20T18:24:43+5:30

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास चक्रपाणी वसाहत येथे घडला हा प्रकार

The mobile was forcibly looted along with the two-wheeler at Pimpri-Chinchwad; The three were handcuffed | पिंपरीत सुऱ्याच्या धाकाने दुचाकीसह, मोबाईल जबरदस्तीने लुटला; तिघांना ठोकल्या बेड्या

पिंपरीत सुऱ्याच्या धाकाने दुचाकीसह, मोबाईल जबरदस्तीने लुटला; तिघांना ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देएकूण ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटला

पिंपरी : दुचाकीवरून जाणाऱ्या तीन मित्रांना अडवून लोखंडी सुऱ्याच्या धाकाने त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम लुटून नेल्याचा प्रकार रविवारी चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला. याप्रकरणी मनोज गजानन बुध (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. संजय दादाभाऊ माने (वय ४०), अजय विनायक म्हस्के (वय २७), किरण सुरेश बोबले (वय २४, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुध आणि त्यांचे मित्र बजरंग साळुंके व शुभम नागिले हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवर चक्रपाणी वसाहत येथे चालले होते. त्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी त्यांना अडविले. लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून २० हजार रुपये किंमतीची दुचाकी, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटला.

Web Title: The mobile was forcibly looted along with the two-wheeler at Pimpri-Chinchwad; The three were handcuffed