शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:45 IST

तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, पीएमपी प्रशासनाची प्रतिक्रिया; ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे हाल

- आकाश  झगडे

पिंपरी
: पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट’ म्हणून ओळख होत असताना, सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बसेसचा कारभार मात्र उलट्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक बसेसवरील डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सध्या बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना बसचा मार्ग आणि क्रमांक ओळखणे कठीण झाले आहे. बोर्ड बंद असलेल्या बसेसची संख्या अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, अशी प्रतिक्रिया पीएमपी प्रशासनाकडून मिळाली.

लांबून बस ओळखणे अशक्य

बसच्या पुढच्या, मागच्या आणि एका बाजूला असलेले हे डिजिटल बोर्ड प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या बोर्डवर नारंगी रंगाच्या मोठ्या अक्षरांत बसचा मार्ग आणि क्रमांक झळकतो. ज्यामुळे प्रवाशांना तो लांबूनच स्पष्ट दिसतो. बोर्ड बंद असल्याने प्रवाशांना बस जवळ आल्याशिवाय ती नेमकी कुठे जाणार आहे, हे कळत नाही. यामुळे अनेकदा बस सुटते किंवा चुकीच्या बसमध्ये चढण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहेत.

पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे केवळ एक दोन बसेसमधील बोर्ड बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रमुख बसस्थानकांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक बसेसचे बोर्ड पूर्णपणे बंद होते. यात छोट्या इंद्रधनुष्य बसमध्ये हे बोर्ड बंद असण्याचे प्रमाण जास्त होते. नवीन इलेक्ट्रिक एसी बसचे डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सुरू असल्याचे आढळून आले.

बस स्टॉपवर उभे असताना लांबून बोर्ड दिसला की तयारी करता येते. आता बस अगदी जवळ आल्यावर नंबर शोधावा लागतो. प्रशासनाला हे साधे बोर्ड दुरुस्त करता येत नाहीत का? - रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ नागरिक

रात्रीच्या वेळी किंवा पावसात बसचे नंबर लांबून अजिबात दिसत नाहीत. डिजिटल बोर्डचा मुख्य फायदा हाच असतो की ते अंधारातही स्पष्ट दिसतात. काही बोर्ड बंद असल्याने बस जवळ आल्यावर धावत जाऊन कंडक्टरला विचारावे लागते, यात अनेकदा बस सुटून जाते.- अंकिता साळुंखे, बस प्रवासी

तांत्रिक अडचणीमुळे एक-दोन बसमधील आयटीएमएस प्रणाली बंद असू शकते.- किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

English
हिंदी सारांश
Web Title : PMPML bus digital boards failing, causing passenger inconvenience and confusion.

Web Summary : Many PMPML bus digital boards are non-functional, making it difficult for passengers to identify bus routes, especially for seniors and those new to the city. The administration claims only a few buses are affected, but on-site inspections reveal widespread issues.
टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलdigitalडिजिटलpassengerप्रवासीSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाticketतिकिट