शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

Power Outage: उन्हाचा तडाखा आणि भोसरीत वारंवार वीज खंडित; नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:26 IST

Bhosari Power Outage: गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

भोसरी : परिसरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जयदीप पार्क येथील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाडामुळे खंडोबा माळ, जयदीप पार्क, दिघी रस्ता तसेच दिघीमधील आदर्शनगर या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. कधी केबल नादुरुस्त होणे, तर कधी फिडरमध्ये बिघाड होणे, अशा कारणांमुळे दिवसातून अनेक वेळा वीज जयदीप पार्क येथील रोहित्र बिघाडामुळे खंडोबा माळ, दिघी रस्ता व आदर्शनगर परिसर अंधारात जात आहे. त्यामुळे उकाड्याच्या तीव्रतेत भर पडत आहे.

विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ निश्चित नसून कधी दिवसा तर कधी मध्यरात्रीही अचानक वीज जाते. दि. १५ एप्रिलच्या रात्रीदेखील अचानक वीज खंडित झाली होती. काही वेळानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला, मात्र लगेचच विद्युत दाब वाढल्याने पुन्हा खंडित झाली. या प्रकारामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी असून, तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.

तत्काळ उपाययोजना कराविशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा निश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी तासन्तास खंडीत होणारा वीजपुरवठा बंद करावा, मागणी आहे.

जयदीप पार्क येथील रोहित्रात बिघाड झाल्याने नादुरुस्त झाला होता. बिघाड झालेले रोहित्र बदलून नवीन बसविण्याचे काम सुरू आहे. काम संपल्यावर वीज पूर्ववत सुरू करून समस्या सोडवली जाईल.  राजेश घोडे, सहायक अभियंता, महावितरण, भोसरी रात्री-बेरात्री कधीही वीज जाते. फोन केल्यावर पंधरा मिनिटात येईल, म्हणून सांगण्यात येते, मात्र तासभर येत नाही. उन्हाळ्यात वीज जाण्याचे प्रमाण वाढले असून, सकाळी पाणी येण्याच्या वेळेत सुद्धा वीज नसते.  - संतोष मुळे, खंडोबा माळ, भोसरी

English
हिंदी सारांश
Web Title : Bhosari Residents Suffer as Heatwave Causes Frequent Power Outages

Web Summary : Bhosari residents are facing frequent power outages due to a faulty transformer, especially in Khandoba Mal and Dighi areas. The outages, occurring randomly, disrupt daily life and damage appliances. Residents demand a permanent solution from Mahavitaran to address the issue, particularly during the heatwave.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज