'तो' चढला वीज टॉवरवर; खाली उतरण्यास नकार..! प्रशासन हतबल; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:27 IST2026-04-28T12:26:49+5:302026-04-28T12:27:07+5:30

टॉवरवरील व्यक्ती खाली येत नसल्याने प्रशासन हतबल;रुपीनगर येथील घटना पोलिस आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू

'He' climbed the electricity tower; refused to come down..! Administration desperate; What exactly happened? | 'तो' चढला वीज टॉवरवर; खाली उतरण्यास नकार..! प्रशासन हतबल; नेमकं काय घडलं?

'तो' चढला वीज टॉवरवर; खाली उतरण्यास नकार..! प्रशासन हतबल; नेमकं काय घडलं?

निगडी : रुपीनगर येथील अंकुश चौकात हायटेन्शन वीज टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे सोमवारी निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, अनेक तास उलटूनही संबंधित व्यक्ती खाली उतरायला तयार नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिस, अग्निशमन दल आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, वारंवार समजूत काढूनही संबंधित व्यक्ती टॉवरवरच उभा असल्याने पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. अग्निशमन दलाने जाळी व इतर बचाव साहित्य तयार ठेवले असले तरी उंची आणि टॉवरची रचना लक्षात घेता बचावकार्य कठीण ठरत आहे.

दरम्यान, काही स्थानिक नागरिक व संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही तो खाली उतरायला तयार नसल्याने प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे अंकुश चौक परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, पोलिसांनी काही मार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.

याशिवाय, भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : आदमी बिजली के टॉवर पर चढ़ा, उतरने से इनकार; प्रशासन बेबस

Web Summary : निगडी के रूपनगर में एक आदमी बिजली के टॉवर पर चढ़ गया, जिससे तनाव फैल गया। पुलिस, दमकल और महावितरण के अधिकारियों के प्रयासों के बावजूद, वह नीचे उतरने से इनकार कर रहा है। यातायात प्रभावित है, और अधिकारी बचाव कार्य में जुटे हैं। नागरिकों से सहयोग करने का अनुरोध किया गया है।

Web Title : Man Climbs Electricity Tower, Refuses to Descend; Administration Helpless

Web Summary : A man climbed an electricity tower in Rupinagar, Nigdi, causing tension. Despite efforts by police, fire brigade, and MSEDCL officials, he refuses to come down. Traffic is affected, and authorities are struggling with the challenging rescue operation. Citizens are requested to cooperate and avoid crowding.