देशात हजारो राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:10 IST2026-05-19T15:10:37+5:302026-05-19T15:10:57+5:30

पक्षात काम करताना मान-पान आणि प्रतिष्ठा आपापसात ठेवावी, परंतु मिळालेल्या प्रत्येक मानाचा सन्मान करणे देखील तितकेच आवश्यक आहे

Even though there are thousands of political parties in the country, only BJP will continue to work sustainably - Ravindra Chavan | देशात हजारो राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार - रवींद्र चव्हाण

देशात हजारो राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार - रवींद्र चव्हाण

पिंपरी : सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या कोणत्याही वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची प्रत्येकाने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. पक्षात काम करताना मान-पान आणि प्रतिष्ठा आपापसात ठेवावी, परंतु मिळालेल्या प्रत्येक मानाचा सन्मान करणे देखील तितकेच आवश्यक आहे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी लोणावळ्यात दिला.

भाजपाच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा भव्य प्रशिक्षण लोणावळ्यात झाले. दोन दिवसीय एकूण १२ विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर सखोल चर्चा केली. पिंपरी चिंचवड जिल्हा प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थींना पक्षाची स्थापनेपासून ची सर्व माहिती असणारी प्रदर्शन झाले. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते केले.

रवींद्र चव्हाण म्हणाले, 'देशात अडीच हजारांहून अधिक राजकीय पक्ष असले, तरी केवळ भाजपामध्येच शाश्वत कार्य निरंतर सुरू राहणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या गल्लीगल्लीत भाजपा दिसला पाहिजे आणि संघटनेच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने पक्ष शिस्त आपल्या आचरणात आणली पाहिजे. पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळणे आवश्यक आहे. 

Web Title : हजारों दलों के बावजूद भाजपा ही सतत कार्य करती रहेगी: चव्हाण

Web Summary : रवींद्र चव्हाण ने लोनावाला में प्रशिक्षण में पार्टी अनुशासन और सम्मान पर जोर दिया। उन्होंने कई राजनीतिक दलों के बीच भाजपा की अनूठी, स्थायी कार्यशैली पर प्रकाश डाला और संगठन के भीतर प्रत्येक समर्पित कार्यकर्ता के महत्व पर जोर दिया।

Web Title : Only BJP sustains continuous work despite thousands of parties: Chavan.

Web Summary : Ravindra Chavan emphasized party discipline and respect at a Lonavala training. He highlighted BJP's unique, enduring work ethic amidst numerous political parties and stressed the importance of every dedicated worker within the organization.