शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेस सोन्याला झळाळी; सराफा बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:11 IST

Akshaya Tritiya : महागाई आणि दरवाढीचा परिणाम नाही; हलक्या वजनाच्या दागिन्यांना वाढती पसंती, मजुरीत सवलतींची रेलचेल

पिंपरी : शहरातील सराफा बाजारास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी मिळत असून, महागाई व सोन्याच्या वाढत्या दरांनंतरही ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवशी सोने खरेदी केल्यास समृद्धी आणि वैभव वाढते, अशी धारणा असल्याने बाजारात खरेदी आणि बुकींगचा जोर वाढला आहे. अक्षय तृतीया रविवारी असून, दसऱ्यापेक्षाही आता सोने खरेदीला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १ लाख ५२ हजार ५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यावर तीन टक्के जीएसटी आणि ७ ते १२ टक्क्यांपर्यंत मजुरी आकारली जात असली तरी ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही.

हलक्या वजनाच्या दागिन्यांची ‘क्रेझ’

बाजारात सध्या हलक्या वजनाच्या दागिन्यांची विशेष ‘क्रेझ’ दिसत आहे. वाढत्या दरामुळे सराफा व्यावसायिकांनीही ग्राहकांच्या खिशाला परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत नव्या ‘ट्रेंड’ला चालना दिली आहे. दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ज्वेलर्सनी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. 

अक्षय तृतीयेनिमित्त सोन्याच्या दागिन्यांची बुकींग जोरात आहे. दरवर्षी या सणाला सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. दसरा सणापेक्षाही अक्षय तृतीयेला सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळतो. -सुनील सोनिगरा, संचालक, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स, देहूरोड  

सध्या लग्नसराईसाठी आणि अक्षय तृतीयेचे वेगवेगळे बुकिंग सुरू आहे. महागाई असली किंवा सोन्याचे दर वाढले तरी सोन्यावरील ग्राहकांची विश्वास कायम असल्याने बुकिंगवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. मजुरीवर सवलत दिली आहे. -रवी कावेडिया, संचालक कावेडिया ज्वेलर्स प्रा. लि., जुनी सांगवी. 

आमच्या भोसरी येथील नूतनीकरण केलेल्या शाखेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. यानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भोसरी शाखेला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोन्याच्या मजुरी दरावर ४३ टक्के इतकी घसघशीत सवलत दिली आहे. -मयूर सोलंकी, सोलंकी ज्वेलर्स, भोसरी. 

सोन्याचे दर सध्या स्थिर आहेत. मजुरीवर थेट ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी सोन्याची आगाऊ ४० टक्के बुकिंग झाली आहे. हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.  - विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स, भोसरी

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya Sparks Gold Rush: Jewelry Market Sees High Demand

Web Summary : Pimpri's jewelry market shines as Akshaya Tritiya boosts gold sales despite high prices. Lightweight jewelry is popular, and jewelers offer discounts, attracting customers for the auspicious occasion.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGoldसोनंAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया