अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:49 IST2026-01-30T14:48:44+5:302026-01-30T14:49:54+5:30

पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ हे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे

Ajitdada accelerated the all-round development of Maharashtra; 'Ajit Srishti' memorial should be built in Pimpri Chinchwad - Mahesh Landge | अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ हे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची जपणूक होणे ही केवळ भावना नाही, तर आम्हा पिंपरी-चिंचवडकरांची जबाबदारी आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देईल. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे. 

चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू असून, भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, या इमारतीच्या आवारातच दिवंगत अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेले स्मारक उभारण्यात यावे.

Web Title : अजित पवार का महाराष्ट्र विकास स्मरण; पिंपरी चिंचवड में स्मारक प्रस्तावित।

Web Summary : विधायक महेश लांडगे ने पिंपरी चिंचवड में अजित पवार के लिए 'अजित सृष्टि' स्मारक का अनुरोध किया। उन्होंने पवार के विकासात्मक योगदानों का हवाला देते हुए त्वरित अनुमोदन और मूर्ति और चित्र के माध्यम से श्रद्धांजलि देने का आग्रह किया।

Web Title : Ajit Pawar's Comprehensive Development of Maharashtra Remembered; Memorial Proposed in PCMC.

Web Summary : MLA Mahesh Landge requests 'Ajit Srushti' memorial for Ajit Pawar in PCMC. He cites Pawar's developmental contributions, urging quick approval and tribute through a statue and portrait.