मॉडेल नाही ही आहे जगातील 'Sexiest' खेळाडू, पाहा Hot Photo!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 12:35 PM2020-02-23T12:35:18+5:302020-02-23T12:38:52+5:30

एलिसा स्केमिड्ट हे नाव आतापर्यंत कोणी एकलेही नसेल... टोक्यो ऑलिम्पिक 2020 पूर्वी हे नाव चर्चेत येण्यामागे एक कारण आहे.

एलिसा स्केमिड्ट हे नाव आतापर्यंत कोणी एकलेही नसेल... टोक्यो ऑलिम्पिक 2020 पूर्वी हे नाव चर्चेत येण्यामागे एक कारण आहे.

एलिसा ही जर्मनीची धावपटू आहे आणि ही 21 वर्षीय खेळाडू जगातील सर्वात sexiest athlete म्हणून ओळखली जात आहे.

2017 च्या युरोपियन 20 वर्षांखालील अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत एलिसा हे नाव पहिल्यांदा चर्चेत आले.

एलिसानं जर्मनीला 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीचे रौप्यपदक जिंकून दिले.

मागील नोव्हेंबर महिन्यात एलिसा 21 वर्षांची झाली आणि गतवर्षी झालेल्या 23 वर्षांखालील युरोपियन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत तिने 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीचे कांस्यपदक जिंकले.

पण, मैदानी स्पर्धांप्रमाणे एलिसा सोशल मीडियावरही तिच्या हॉट फोटोनी धुमाकुळ घालत आहे.

सोशल मीडियावर तिचे 6 लाख 25 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ऑस्ट्रेलियन मॅगझीन ‘Busted Coverage’ ने एलिसाला “Sexiest Athlete in the World” हे नाव दिले आहे.

आगामी काही वर्षांत एलिसा हे जागतिक अॅथलेटिक्समध्ये आघाडीवर असेल..

प्लेबॉयसाठी पोज करण्यास एलिसानं नकार दिल्यावर बरीच चर्चा रंगली होती.