CoronaVirus Updates: देशात नव्या ३९ हजार ३६१ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:24 AM2021-07-26T11:24:24+5:302021-07-26T11:29:15+5:30

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०५ लाख ७९ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या २४ तासांत ३९ हजार ३६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ११ हजार १८९ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ३५ हजार ९६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०५ लाख ७९ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रविवारी ६ हजार ८४३ रुग्ण आणि १२३ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ५५२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४ हजार ९८५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात दिवसभरात ५ हजार २१२ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, आतापर्यंत ६० लाख ३५ हजार २९ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के झाले असून, मृत्युदर २.०९ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६८ लाख ४६ हजार ९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख १७ हजार ३६२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात पुण्यात १५ हजार ८०३, ठाण्यात ११ हजार ४९४, ठाण्यात ७ हजार ६८१, कोल्हापूर १२ हजार १३८, सांगली १० हजार ३४७ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या १२३ मृत्यूंमध्ये मुंबई १०, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ३, कल्याण-डोंबिवली मनपा ६, मीरा-भाईंदर मनपा १, वसई-विरार मनपा ६, रायगड ९, पनवेल मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा ३, मालेगाव मनपा १, अहमदनगर ११, जळगाव मनपा २, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १४, कोल्हापूर ६, कोल्हापूर मनपा १, सांगली ६, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी ११, औरंगाबाद ५, उस्मानाबाद ७, बीड ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.