ब्रालेस आऊटफिटमध्ये फॅशन करायला गेली, पण...; भूमी पेडणेकरचे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:39 AM2024-04-26T09:39:01+5:302024-04-26T09:45:09+5:30

भूमी पेडणेकरचं ब्रालेस फोटोशूट, बोल्ड फोटो पाहून नेटकरी सुसाट

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. दम लगा के हैशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली.

अभिनयाबरोबर सध्या भूमीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे. भूमीने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाचे डिझायनर जॅकेट आणि पँट परिधान करत भूमीने फोटोशूट केलं आहे.

या ब्रालेस फोटोशूटमध्ये भूमीने तिची फिगर फ्लॉन्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.

भूमीचं हे ब्रालेस फोटोशूट पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. काहींनी भूमीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

"हिला पण चित्रपट मिळत नाहीयेत वाटतं", "तुम्ही बॉलिवूडच्या हिरोईन काहीही कसं घालता", "तू या आऊटफिटमध्ये चांगली दिसत नाहीस" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.