SRH च्या नव्या 'फॅन गर्ल' ला पाहून काव्य मारनला विसराल! कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादची गाडी सुसाट पळताना दिसतेय... १० पैकी ६ सामने जिंकून SRH १२ गुणांसह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सनरायझर्स हैदराबाद म्हणटं की काव्या मारन हिची चर्चा व्हायलाच हवी. सनरायझर्स हैदराबादची सह मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिटी आयपीएलमध्ये चर्चा असतेच. काव्या ही सन नेटवर्कचे मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सने गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली. भुवनेश्वर कुमारने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर RR च्या फलंदाजाला बाद करून १ धावेने SRH ला विजय मिळवून दिला.

भुवीचा तो शेवटचा चेंडू पडेपर्यंत काव्या अगदी शांत व तणावग्रस्त दिसली, परंतु भुवीने विकेट घेताच तिने जोरदार जल्लोष केला. मात्र, यावेळी तिच्याएवजी SRH च्या मिस्ट्री गर्लचीच चर्चा रंगताना दिसतेय.

ही मिस्ट्री गर्ल सनरायझर्स हैदराबादला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली आणि साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. राम्या कुरलेती असे तिचे नाव आहे.

राम्या कुरलेती ही एक भारतीय तेलुगु चित्रपट अभिनेत्री आहे. तिने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ' हुशारू ' या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

' माइल्स ऑफ लव्ह ', ' फर्स्ट रँक राजू ' आणि 'BFF' म्हणजेच 'बेस्ट फ्लॅटमेट फॉरएव्हर' या वेब सीरिजमध्ये अभिनय केल्यानंतर ती प्रसिद्ध झाली