भरजरी साडी अन् पारंपरिक मराठमोळा साज; वर्षभरानंतर 'पारु'ने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:21 PM2024-05-04T12:21:42+5:302024-05-04T12:24:59+5:30

Sharayu sonawane: खऱ्या आयुष्यात झालंय 'पारु'चं लग्न; वर्षभरानंतर शेअर केले शरयूने विवाहसोहळ्याचे फोटो

छोट्या पडद्यावर सध्या पारु ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे मुख्य भूमिका साकारत आहे.

या मालिकेच्या माध्यमातून शरयू अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या या लाडक्या पारुचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे.

नुकताच पारुने म्हणजेच अभिनेत्री शरयूने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या लग्नातील काही खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शरयूने वर्षभरापूर्वी फिल्ममेकर जयंत लाडे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे तिच्या लग्नाविषयी फारसं कोणाला ठावूक नव्हतं.

शरयूने लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

मोठ्या थाटामाटात शरयू- जयंत यांचा लग्नसोहळा रंगल्याचं या फोटोवरुन लक्षात येत आहे.

शरयूने भरजरी काठापदराची साडी नेसली होती. त्यावर साजेसा मेकअपही केला होता.