CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 08:29 AM2020-06-07T08:29:40+5:302020-06-07T09:57:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचे प्रयत्न हे केले जात आहे. अनेक ठिकाणी संशोधन केले जात आहे.

देशामध्ये कोरोना साथीने माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नाहीत. या आजाराने एका दिवसात 294 जणांचा बळी घेतला. याआधी देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मरण पावले नव्हते.

कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 36 हजारांहून अधिक झाली आहे. या साथीमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 6 हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

देशात 1 लाख 15 हजार 942 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 14 हजार 72 रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांत भारतामध्ये कोरोनाचे 9 हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.

कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचे प्रयत्न हे केले जात आहे. अनेक ठिकाणी संशोधन केले जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील संशोधकांनी कोरोनावर एक खास किट विकसित केलं आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादच्या संशोधकांनी असा कोरोना चाचणीसाठी एक किट विकसित केलं आहे. या किटच्या मदतीने अवघ्या 20 मिनिटांत रिझल्ट मिळेल असा दावा करण्यात आला आहे.

आयआयटी हैदराबादने विकसित केलेले कोविड -19 टेस्टिंग किट सध्या वापरल्या जाणार्‍या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनवर आधारित नाही.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे किट 550 रुपये किंमत लक्षात ठेवून विकसित केले गेले आहे. मात्र मोठ्या संख्येने उत्पादन केल्यास याची किंमत 350 रुपयांपर्यंत असू शकते.

हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात चाचणी किटच्या पेटंटसाठी संशोधकांनी अर्ज केला आहे आणि क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे परवानगी मागण्यात आली आहे.

आयआयटी हैदराबाद येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी आम्ही कोरोना चाचणी किट विकसित केली आहे, जी 20 मिनिटांत लक्षणं असलेल्या व नसलेल्या रुग्णांच्या चाचणी अहवाल देईल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते आरटी-पीसीआरसारखे कार्य करते असं म्हटलं आहे.

"कमी किंमतीची ही चाचणी किट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेली जाऊ शकते आणि रुग्णाच्या घरी त्याची चाचणी केली जाऊ शकते."

सध्याच्या चाचणी प्रणालीचा पर्याय म्हणून ही चाचणी किट वापरली जाऊ शकते. आम्ही कोविड-19 जीनोमच्या संरक्षित प्रदेशांचा विशिष्ट क्रम शोधला आहे असं देखील प्राध्यापकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे दररोज सरासरी 239 जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवडाभरात देशात कोरोनामुळे दररोज सरासरी 179 जणांचा मृत्यू झाला होता.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत.