'या' देशाला मिनी हिंदुस्तान नावाने का ओळखले जाते? कोणता देश आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 05:14 PM2021-07-11T17:14:23+5:302021-07-11T17:26:56+5:30

जगात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय लोक राहतात. मात्र जगात एक असा देश आहे जो मिनी हिंदुस्तान नावाने ओळखला जातो. का बरं? घ्या जाणून

अनेक देशांमध्ये भारतीय लोक राहतात. काही देशांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. असाच एक देश आहे जिथे भारतीयांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

या देशाची मुख्य भाषा हिंदी आहे. ही या देशाची राजभाषा देखील आहे. तसेच या देशामध्ये हिंदीमध्ये शिकवले जाते. या देशात हिंदीमध्ये लिहिले वाचले जाते.

या देशाचे सौंदर्य लोभसवाणे आहे. सुंदर समुद्र किनारा, डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य अशी या देशाची ओळख आहे.

या देशात प्रत्येक गल्लीत एखादे तरी मंदिर आहेच आहे. तसेच अनेक सुंदर मशीदे आहेत जे या देशाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.

येथे शंभरवर्षापूर्वी अनेक भारतीय लोक येथे येऊन राहिले त्यामुळे या देशामध्ये भारतीय जास्त प्रमाणात आहेत.

येथील लोक रामनवनी, होळी, दिवाळी सारखे सण साजरे करतात.

या देशाचे नाव आहे फिजी जो प्रशांत महासागरातील द्विपांमध्ये सर्वात विकसित द्वीप आहे.

हा अत्यंत नैसर्गिक विविधतेने सुंदर देश असून, खनिजे, वनसंपत्ती आणि जलस्त्रोतांनी समृद्ध असा देश आहे. त्यामुळेच येथे पर्यटकही मोठ्या प्रमाणाव येतात.

फिजी हा द्विपसमुह ३२२ द्विपांचा आहे ज्यापैकी १०६ द्विपांवर मानवी वस्ती आहे.

फिजी हे द्विप १५ करोड साल पुर्वी ज्वालामुखींच्या स्फोटामुळे तयार झाले आहे. आजही येथील काही द्विपांवर ज्वालामुखीचे स्फोट होतात.