हिटलरपासून ते सद्दामपर्यंत...जगातले हे सर्वात चर्चेतले हुकूमशहा नेमकं खायचे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 02:50 PM2020-03-06T14:50:59+5:302020-03-06T15:20:37+5:30

व्हिक्टोरिया क्लार्क आणि मेलिसा स्कॉट यांच्या "Dictators' Dinners: A Bad Taste Guide to Entertaining Tyrants या पुस्तकात याबाबत किस्से आहेत.

जगातले सर्वात मोठे हुकूमशहा खाण्या-पिण्याच्या बाबतीत फार वेगळे होते. आपल्या सनकी स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या या हुकूमशहांचे खाण्याचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. जसे की, आपल्या पचनक्रियेच्या समस्येमुळे हिटलर हा व्हेजिटेरियन झाला होता. चला आज आम्ही तुम्हाला जगातले सर्वात मोठे हुकूमशहा काय खात होते हे सांगणार आहोत.

व्हिक्टोरिया क्लार्क आणि मेलिसा स्कॉट यांच्या "Dictators' Dinners: A Bad Taste Guide to Entertaining Tyrants या पुस्तकात याबाबत किस्से आहेत.

इतिहासातील सर्वात क्रूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिटलरची फेव्हरेट डिश स्टफ्ड कबूतर होती. ही डिश पिस्त्यात भरून तयार केली जात होती. पण नंतर हिटलर पूर्णपणे शाकाहारी झाला होता.

हिटलरच्या अन्नात विष टाकण्याचा धोका असल्याने त्याचं अन्न टेस्ट करण्यासाठी १५ जणांची टीम ठेवण्यात आली होती. ते काही खाल्ल्यावर ४५ मिनिटांनंतरही जिवंत राहत असतील तरच हिटलर ते अन्न खात असे.

युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये हिटलरची पचनक्रिया बिघडली होती. त्यामुळे या दिवसांमध्ये तो केवळ दलिया आणि उकडलेले बटाटे खात होता.

सद्दाम हुसेन हा सुद्धा आपल्या लाइफस्टाईलसाठी प्रसिद्ध होता. तो ब्रेकफास्टमध्ये उंटीणीची दूध, ब्रेड आणि मध खात असे. लंच आणि डिनरमध्ये तो विशेष प्रकारचं मद्य सेवन करत असे.

सद्दामच्या २० महालांच्या किचनमध्ये त्याच्यासाठी चरबी काढलेल्या मेंढी, बीफ, झिंगे आणि ऑलिव्स तयार राहत असे. सद्दामचं जेवण तयार करण्याआधी न्यूक्लिअर सायंटिस्टकडून चेक केलं जात होतं.

कारण त्यात रेडिएशन किंवा विष असण्याचा धोका राहत होता. अनेकदा चेन्च म्हणून तो किचनमध्ये जाऊन स्वत: जेवण तयार करत असे.

ईदी अमीन या युगांडाच्या राष्ट्राध्यक्षाच्या जेवणात झिंगे, अनेक प्रकारचे कीडे राहत असे. त्याचं आवडतं जेवण म्हणजे भाजलेलं बोकड आणि बाजरीची भाकरी हे होतं. तो एका दिवसात ४० संत्रीही खात असे

ईदीबाबत असेही सांगितले जाते की, तो त्याच्या शत्रूंना मारल्यावर त्यांचंही मांस खात होता. याबाबत विचारल्यावर त्याने सांगितले होते की, मला मनुष्यांचं मांस पसंत नाही. पण ते फार चांगलं असतं.

इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी जेवणावेळी कटोरा भरून सलाद खात असे. त्यात खूपसारे कापलेली लसणाची तुकडे असायचे. मुसोलिनीला लसूण खूप आवडायचा.

त्याच्या या आवडीने त्याची पत्नी रशेल परेशान होती. कारण तिला लसणाचा वास येत असे, त्यामुळे ती त्याच्याजवळ जाणं टाळत असे.

मुसोलिनीला इटलीतील लोकप्रिय पदार्थ पास्ता पसंत नव्हता. त्याच्या मते पास्ता लोकांना कमजोर आणि आळशी करतो. मुसोलिनी हा महात्मा गांधी आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या शाकाहाराने फार प्रभावित होता. त्याने ४० व्या वयात मद्यसेवनही बंद केलं होतं.

नॉर्थ कोरियाचे आधीचे हुकूमशहा किम जोंग इल याला शार्कच्या पंखांचं सूप आणि कुत्र्यांचं मांस फार पसंत होतं. त्याच्या जेवणासाठी खासप्रकारचे तांदूळ पिकवले जायचे.

महिलांची एक टीम तांदूळ निवडत असत. जेणेकरून त्याच्या प्लेटमधील भाताचे दाने एका शेपचे, रंगाचे आणि साइजचे असावेत.