भय इथले संपत नाही! कोरोनाग्रस्त महिलेवर तब्बल 9 महिन्यांपासून सुरू आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 02:10 PM2020-12-11T14:10:32+5:302020-12-11T14:19:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सात कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा हा 70,735,868 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1,588,759 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून त्यातील काही चाचण्यांना यश येत आहे. तसेच क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून योग्य काळजी घेतली जात आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ सातत्याने समोर येत असून काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्तांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून लाखो लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असून त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. तब्बल 49,166,194 लोक उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कोरोनाग्रस्त महिलेवर तब्बल 9 महिन्यांपासून उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

कॅनडामधील 35 वर्षीय अ‍ॅशले एंटोनियोवर गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनावर उपचार सुरू आहेत. इतके दिवस उपचार सुरू असून देखील अद्यापही ती आजारातून बरी झाली नाही.

कोरोना आता आयुष्यभर पाठ सोडणार नसल्याचं अ‍ॅशले एंटोनियोने म्हटलं आहे. डोकेदुखी, छाती दुखणे, सांधेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या गोष्टींमुळे ती खूप त्रस्त झाली आहे.

काही दिवस मला बरं वाटतं. मात्र पुन्हा श्वास घेता येत नाही तसेच शरीराची हालचाल करता येत नसल्याची तक्रार तिने केली. सध्या अ‍ॅशलेवर उपचार सुरू आहेत. लवकरत ती आजारांवर मात करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अ‍ॅशलेला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्यावर सातत्याने उपचार सुरू आहेत. या दरम्यान तिला अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read in English