इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:06 AM2024-05-21T09:06:21+5:302024-05-21T09:18:03+5:30

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. अझरबैजान सीमेजवळील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

Iran President Raisi's accident or an assassination? This is the mystery of the helicopter crash | इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य

इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य

इराणचे राष्ट्रापती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघात हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठे गूढ बनले आहे. रईसी यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात झाला की घातपात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेलिकॉप्टर अपघातानंतर अनेक संशायस्पद गोष्टी सापडल्या आहेत.

आफ्रीन हायड्रो पॉवर प्रकल्पातून उड्डाण घेतल्यानंतर रईसी यांचे हेलिकॉप्टर बेल २१२ इराण सीमेवर जोल्फाजवळ पोहोचले. अझरबैजानी सीमेवर मोसादची अनेक गुप्त ठिकाणे असल्याचे सांगितले जाते. रईसी यांचे हेलिकॉप्टर ४० वर्षांपेक्षा जुने होते. मोसाद यंत्रणा सहज हॅक करू शकते आणि मोसादने हेलिकॉप्टरवर इलेक्ट्रॉनिक हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला

हेलिकॉप्टरच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टमवर हा हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे. मोसादने इलेक्ट्रॉनिक हल्ला करून हेलिकॉप्टरचे सॅटेलाइट कनेक्शन कापले असावे. या हल्ल्यामुळे हेलिकॉप्टरची संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली असती. यानंतर हेलिकॉप्टर निश्चित मार्गापासून दूर गेले आणि खूप पुढे गेले असावे. कॉम्प्युटर सिस्टीम डाऊन असल्याने पायलटला उंचीचा अंदाज आला नसावा आणि टेकडीवर आदळल्यानंतर अपघात होण्याची शक्यता असते, या अपघातामागे खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे.

ढिगारा सापडल्यानंतर समोर आलेले व्हिडीओ हे षड्यंत्राकडे बोट दाखवणारे आहेत, याचा दुसरा पुरावा म्हणजे हेलिकॉप्टरचे तुकडे फारच छोटे आहेत आणि मलबा मोठ्या भागात पसरला आहे, त्यामुळे हेलिकॉप्टरचा स्फोट झाला की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पहिल्यांदा स्फोट झाला आणि नंतर विस्फोट झाला. तिसरा पुरावा म्हणजे अपघातापूर्वी वैमानिकाने कोणताही आपत्कालीन संदेश दिला नाही हेलिकॉप्टरचा अचानक स्फोट झाला का? अझरबैजानमधून एकाचवेळी तीन हेलिकॉप्टरने उड्डाण केले, पण राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर खराब हवामानाचा बळी का? शेवटच्या क्षणी परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियान हे रईसीच्या हेलिकॉप्टरमध्ये का बसले होते, रईसी आणि अब्दुल्लाहियान हे दोघेही कटाचे प्रमुख लक्ष्य होते. बेल 212 क्रॅश होईल हे ठरले होते का?, अशा चर्चा सुरू आहेत. 

हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी हवामानाची माहिती गोळा केली जाते, त्यामुळे खराब हवामानाची माहिती रईसी यांच्या हेलिकॉप्टर कर्मचाऱ्यांना वेळेत देण्यात आली नव्हती का? एका ओपन सोर्स इंटेलिजन्सने दावा केला आहे की हेलिकॉप्टर पायलटने क्रॅश होण्याच्या काही वेळापूर्वी कम्युनिकेशन रेडिओ बंद केला होता. पायलटने असे का केले? हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी त्यातील एक व्यक्ती बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे. हेलिकॉप्टर मार्गांची माहिती लीक झाली होती का? उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तपासणी का झाली नाही आणि हवामानाची अचूक माहिती का गोळा केली  नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

Web Title: Iran President Raisi's accident or an assassination? This is the mystery of the helicopter crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.