वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:52 AM2024-05-21T09:52:45+5:302024-05-21T09:56:02+5:30

अक्षय म्हणाला, 'मला ते अजिबात मान्य नव्हतं की त्याने इतक्या कमी वयात घर सोडावं.'

Akshay Kumar s son Aarav left home at the age of 15 he is not into acting know about him | वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!

वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) मुलगा आरव (Aarav) २१ वर्षांचा आहे. सुपरस्टार अभिनेत्याचा मुलगा असूनही आरव काय म लाईमलाईटपासून दूरच असतो. अक्षयही मुलांबद्दल सार्वजनिकरित्या फार कमी वेळा बोलतो. दरम्यान पहिल्यांदाच एका टॉक शोमध्ये त्याने आरवबद्दल काही खुलासे केले आहेत. क्रिकेटपटू शिखर धवनच्या नव्या टॉक शोमध्ये त्याने आरवच्या आयुष्यातील काही पैलू उलगडले आहेत.

टॉक शोमध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला, "माझा मुलगा आरव लंडन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तो घरापासून दूर राहतोय. त्याला नेहमीच शिक्षणात रस होता आणि त्याला स्वतंत्रच राहायचं होतं. त्यामुळे लंडनला जाण्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याचाच होता. भलेही मला ते अजिबात मान्य नव्हतं की त्याने इतक्या कमी वयात घर सोडावं. पण मी त्याला थांबवू शकलो नाही कारण मी देखील वयाच्या १४ व्या वर्षीच घर सोडलं होतं."

तो पुढे म्हणाला, "आरव स्वत: त्याचे कपडे धुतो, स्वयंपाक करतो, भांडी घासतो आणि त्याला महागड्या कपड्यांचीही आवड नाही. तो खरेदीसाठी सेकंड हँड स्टोर, थ्रिफ्टीमध्ये जातो. त्याला या गोष्टींमध्ये वायफळ पैसे खर्च करायला अजिबात आवडत नाही. आम्ही कधीच त्याला ठराविक गोष्ट करण्यासाठी बळजबरी केली नाही. त्याला सिनेमांमध्ये काम करण्यात रस नाही. मी त्याला म्हणलं तुझं आयुष्य आहे हवं ते कर."

ज्याप्रकारे आरवचं पालनपोषण झालं आहे त्यावर मी खूश असल्याचंही अक्षय कुमार म्हणतो. अक्षय आणि ट्विंकलला नितारा ही मुलगीही आहे. ती सध्या १२ वर्षांची आहे. 

Web Title: Akshay Kumar s son Aarav left home at the age of 15 he is not into acting know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.