आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 7इंडोनेशिया या देशात जिथे २८ कोटी मुस्लिम आहेत, तिथे हजारो हिंदू मंदिरं आहेत. हे पाहून कळतं की धर्म, संस्कृती आणि परंपरा कोणत्याही सीमेत अडकत नाहीत. जगात मुस्लिम देश म्हणजे धार्मिक कट्टरता असं अनेकदा बोललं जातं. पण, इंडोनेशियात जिथे ८७% लोक मुस्लिम आहेत, तिथे १०,००० पेक्षा जास्त हिंदू मंदिरं आहेत. 2 / 7मिशन सनातनमुळे इंडोनेशियातील मंदिरांचा जीर्णोद्धार खूप वेगाने होतोय. एकट्या योग्यकर्ता प्रांतात २४० मंदिरं पुन्हा बांधण्याची योजना सुरू झाली आहे आणि त्यापैकी २२ मंदिरं तयारही झाली आहेत.3 / 7प्रंबानन मंदिर हे १० व्या शतकात बांधलेलं इंडोनेशियातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना समर्पित आहे. याची रचना भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मग्रंथांनी खूप प्रभावित आहे. 4 / 7भूकंप, ज्वालामुखी आणि वेळेच्या माऱ्याला तोंड देत हे मंदिर आजही डौलाने उभं आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय आणि हे आजही हिंदू भाविक आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे.5 / 7भारत आणि इंडोनेशियाचे संबंध फक्त व्यापार किंवा राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर ते हजारो वर्षांची सांस्कृतिक भागीदारी आहे. इंडोनेशियातील कला, नाटक आणि लोककथांमध्ये आजही रामायण आणि महाभारत जिवंत आहेत.6 / 7२०२५ च्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे होते. तेव्हा दोन्ही देशांनी सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी, सागरी संरक्षण आणि व्यापारात एकत्र काम करण्याची घोषणा केली.7 / 7इंडोनेशियाची राष्ट्रीय विमान कंपनी गरुड इंडोनेशिया असो किंवा त्यांच्या चलनावरील गणेशाचं चित्र असो, यावरून कळतं की या देशाने भारतीय परंपरा आणि सनातन संस्कृतीला किती मनापासून स्वीकारलं आहे. बाली, योग्यकर्ता आणि पूर्व जावामध्ये आजही हिंदू प्रथा रोजच्या जीवनाचा भाग आहेत.