Miss Universe 2021 : अँड द 'मिस युनिव्हर्स इज इंडिया' म्हणताच डोळ्यात आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:50 AM2021-12-13T09:50:04+5:302021-12-13T10:22:42+5:30

Miss Universe 2021 : अँड द मिस युनिव्हर्स इज इंडिया.. नावाची घोषणा होताच टाळ्या आणि जल्लोष करण्यात आला. त्यावेळी, हरनाज संधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

इडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. भारताच्या हरनाजने 70 वा मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावत देशाची मान जगात उंचवली आहे.

21 वर्षीय हरनाज मूळ पंजाबची रहिवाशी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता.

इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला.

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारासोबत संधू हातात हात घालून मंचावर उभी होती. त्यावेळेसच ती भावूक झाल्याचं पाहायला मिळाला. स्पर्धेच्या निकालामुळे तिची धाकधूक वाढली होती.

स्पर्धेच्या ज्युरीने मिस युनिव्हर्सच्या नावाची घोषणा करताच हरनाज संधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हरनाजने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खांद्यावर डोके ठेऊन अश्रूंना वाट मोकळी केली.

हरनाजच्या डोळ्यातील आनंदाश्रूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकाच मंचावर आसू आणि हसू पाहून काही काळ तेथे भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

अँड द मिस युनिव्हर्स इज इंडिया.. नावाची घोषणा होताच टाळ्या आणि जल्लोष करण्यात आला. त्यावेळी, हरनाज संधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

हरजानाजने दक्षिण आफ्रिका आणि Paraguay देशाच्या दोन प्रतिस्पर्धकांना मागे टाकत हा किताब जिंकला. मिस युनिव्हर्स 70 च्या ताजवर तिने आपले नाव कोरले.

भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत यापूर्वी दोनवेळा ताज मिळवला आहे. सर्वप्रथम 1994 मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला.

लारा दत्ताने 2000 साली हा किताब जिंकला. त्यानंतर, आता 21 वर्षांनी हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे.