बाप रे बाप! ईराणने तयार केली अंडरग्राउंड 'मिसाइल सिटी', फोटो अन् व्हिडीओ जारी करून दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 01:19 PM2021-03-17T13:19:43+5:302021-03-17T13:28:54+5:30

Iran Missile City : ईराणकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओत कमांडर हुसैन सलामीने सांगितले की, व्हिडीओमध्ये जो दिसत आहे तो मिसाइल सिटीचा छोटासा भाग आहे.

पाश्चिमात्य देशांना इशारा देण्याच्या उद्देशाने ईराणने आपल्या 'मिसाइल सिटी' चे फोटो आणि व्हिडीओ जारी केले आहेत. या फोटोंमध्ये एका अंडरग्राउंड ठिकाणावर भरमसाठ रॉकेट्स बॉम्ब ठेवल्याचं दिसत आहे. ईराणच्या टीव्ही चॅनलवर रिवॉल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर हुसैन सलामी यांना मिसाइलचं निरीक्षण करताना दाखवण्यात आलं आहे. मात्र, मिसाइल सिटीचं लोकेशन जारी केलं गेलं नाही.

ईराणकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओत कमांडर हुसैन सलामीने सांगितले की, व्हिडीओमध्ये जो दिसत आहे तो मिसाइल सिटीचा छोटासा भाग आहे. ईराणचा दावा आहे की, मिसाइल सिटीमध्ये खासप्रकारची टेक्नीक वापरली आहे. ज्याने दुश्मनांचे सिग्नल वेळीच पकडता येतात.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मध्य-पूर्वमध्ये ईराण सर्वात जास्त मिसाइल प्रोग्राम चालवणाऱ्या दैशांपैकी एक आहे. ईराण आपल्या रक्षा क्षेत्रात सतत वापरल्या जाणाऱ्या टेक्नीकला सतत अपग्रेड करतो.

गेल्यावर्षी ईराणच्या रिवॉल्यूशनरी गार्ड्सने दावा केला होता की, त्यांनी गल्फच्या खाडीजवळ अंडरग्राउंड मिलाइल सिटी तयार केली आहे. ईराणने हेही सांगितले होते की, त्यांच्याकडे अशा मिसाइल आहेत ज्या १९०० किमीपर्यंत हल्ला करू शकतात.

जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेने एका ड्रोन हल्ल्यात ईराणचे अल-कुद्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांची हत्या केली होती. यानंतर ईराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला. ईराण अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर म्हणून ईराकमधील अमेरिकी सैन्य अड्ड्यांवर रॉकेट टाकले होते.