Lokmat Money >शेअर बाजार > PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर बाजारावर मोठं वक्तव्य केलं. तसंच ४ जूननंतर शेअर बाजार नव्य शिखरावर असेल, असंही ते म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:43 AM2024-05-20T11:43:26+5:302024-05-20T11:43:53+5:30

PM Modi Share Market : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेअर बाजारावर मोठं वक्तव्य केलं. तसंच ४ जूननंतर शेअर बाजार नव्य शिखरावर असेल, असंही ते म्हणाले.

Market After June 4 share market will be at a new peak PM Modi gave a unique advice to investors | PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला

PM Modi Share Market : निवडणुकांचा शेअर बाजावरही परिणाम होत असतो. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी मुलाखतीदरम्यान शेअर बाजारावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर घसरणारा शेअर बाजार सावरला होता. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ४ जून नंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल असं म्हटलंय.

निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसंच गेल्या १० वर्षांमध्ये शेअर बाजारानं २५ हजार ते  ७५ हजारांपर्यंतची मोठी झेप घेतली. याच वेगानं आताही प्रवास सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
 

सरकारनं अनेक आर्थिक आणि उद्योजकता पूरक सुधारणा केल्या आहेत. आम्ही सेन्सेक्स २५,००० होता, तेव्हापासून प्रवास सुरू केला, आता तो ७५,००० पर्यंत पोहोचलो आहोत. जेवढे सामान्य नागरिक शेअर बाजारात येतील तितकी अर्थव्यवस्था मोठी होत जाते. प्रत्येक नागरिकाची जोखीम घेण्याची क्षमता वाढावी अशी माझी इच्छा आहे. ४ जून ला ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल येईल, त्या आठवड्यात तुम्हाला शेअर बाजार कुठे जातो हे दिसेल. त्याचं प्रोग्रॅमिंग करणारे लोक थकून जातील, असंही ते म्हणाले.
 

सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून मालामाल

 

सरकारी कंपन्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत व्यक्त केलं, सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवून लोक मालामाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांचे शेअर्स १० पटींपेक्षा अधिक वाढले असल्याचं मोदी म्हणाले. 
 

सरकारनं पीएसयूना रिफॉर्म केलंय. यापूर्वी पीएसयूचा अर्थ घसरणं हा होता.परंतु आता शेअर बाजारात त्यांचं मूल्य वाढत आहे. एचएएलकडे पाहा. त्याबाबात कर्मचार्यांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चौथ्या तिमाहीत एचएएलनं विक्रमी नफा मिळवला आणि ही मोठी प्रगती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Market After June 4 share market will be at a new peak PM Modi gave a unique advice to investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.