सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 05:36 PM2024-05-25T17:36:43+5:302024-05-25T17:46:08+5:30

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं.

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता भासते. प्रत्येक जण घराबाहेर पडताना आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवतो. सध्या बाजारात आकर्षक अशा बॉटल्स उपलब्ध आहेत.

प्लास्टिक, काच, स्टिल, माती, तांब्याच्या सुंदर बॉटल्स आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आजकाल बरेचसे लोक प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पितात. त्यांच्याकडे प्लास्टिकचीच बॉटल दिसते.

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, ही बॉटल कार्बन, हायड्रोजन आणि क्लोराइडने तयार केलेली असते.

यामध्ये बीपीए देखील असून ते सर्वात हानिकारक केमिकल्समधील एक आहे. यामुळे हृदयसंबंधित आजार आणि डायबेटीसचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच इतरही समस्या होऊ शकतात.

एक्सपर्टच्या मते लिव्हरसंबंधित देखील आजारांचा धोका असू शकतो. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट देखील कमी होऊ शकतो.

प्लास्टिकची एक बॉटल जर तुम्ही दीर्घकाळ वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण यामुळे हार्मोनल सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

प्लास्टिकच्या बॉटलचा पाणी पिण्यासाठी वारंवार वापर केल्यास लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याची देखील भीती आहे.

प्लास्टिकच्या बॉटलमधून तुम्ही देखील पाणी पित असाल तर ही सवय आताच बदला कारण यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करणं टाळा.