आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 17:11 IST
1 / 7रक्त वाढते : दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरतील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते व अॅनिमिया रोगाचा धोकादेखील टळतो. अॅनिमिया रोगामध्ये शरीरातील लाल रंगांच्या पेशी कमी होतात. 2 / 7सांधेदुखी दूर होते : रोज सकाळी-संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो व शरीरास आराम मिळतो. 3 / 7हृदयविकारापासून होतो बचाव : तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. 4 / 7जखमा लवकर भरुन निघतात : तांब्यामध्ये असलेल्या अॅन्टी-बॅक्टेरिअलमुळे जखमा लवकर भरुन निघण्यास मदत होते. 5 / 7थायरॉइड : लवकर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे ही थायरॉइडची प्रमुख लक्षणे आहेत. तांब्यामधील कॉपर थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचे कार्य करते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. 6 / 7कर्करोग धोका कमी होतो : तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, यामुळे कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. 7 / 7पचन क्रिया सुधीरते : पित्त, गॅस किंवा पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. यामुळे पचनक्रिया सुधारते.