CoronaVirus : इच्छाशक्तीपुढे नियती झुकली; १०७ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:17 PM2020-04-27T12:17:33+5:302020-04-27T12:44:11+5:30

कोरोनाचं संक्रमण संपूर्ण जगभरात पसरत असल्यामुळे भीतीचं वातावरण तयार झाले आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. मृत्यू होत असलेल्यांमध्ये वृध्दांचं प्रमाण जास्त आहे. असं असताना एक चांगली घटना समोर येत आहे. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. पण कोरोनाच्या माहामारीत एक सकारात्मक गोष्ट स्पेनमध्ये घडली आहे.

स्पेनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका वयस्कर महिलेने कोरोनावर मात केली आहे. जगभरातून कोरोनाच्या संक्रमणातून बऱ्या होत असलेल्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त वयस्कर असलेली ही महिला आहे. या महिलेचं वय १०७ वर्ष आहे.

स्पेनमधील माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या पाचव्या वर्षी ही महिला स्पॅनिश फ्लूची शिकार झाली होती. इतक्या कमी वयात स्पॅनिश फ्लूला या महिलेने हरवलं होतं. त्याचप्रमाणे जगातील सगळ्यात मोठ्या कोरोनाच्या माहामारीतून ही आजी सुखरूप बाहेर आली आहे.

स्पेनच्या ऑलिव्ह प्रेसने दिलेल्या माहितीनुसार या वयस्कर महिलेचं पूर्ण नाव एना डेल वॅले आहे. या महिलेसोबतच आणखी ६० लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. पण एना यांनी कोरोनाचा सामना यशस्वीरित्या केला.

ऑक्टोबर १९१३ मध्ये एना पाच वर्षाच्या होत्या तेव्हा स्पॅनिश फ्लू झाला होता. १९१८ तो १९२० मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लूमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

एना यांनी वयाच्या १०७ व्या वर्षात कोरोनाला हरवलं आहे. याशिवाय स्पेनमध्ये १०० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या २ महिला कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून पूर्णपणे चांगल्या झाल्या आहेत. एना यांचं कोरोनातून बरं होणं हे एखाद्या चमत्काराप्रमाणे असल्याचं माध्यमांनी सांगितलं .

त्यांचं वय जास्त असल्यामुळे डॉक्टरांचे उपचार खूप काळजीपूर्वक चालू होते. एना आता स्वतःचं जेवण स्वतः करतात. इतकंच नाही तर त्यांना चालण्या फिरण्यासाठी सुद्धा अडचड येत नाही.