टीव्हीची ‘ही’ बाला ‘बिग बॉस 15’मध्ये करणार धमाका; वाचा, कोण आहे तेजस्वी प्रकाश?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:22 PM2021-09-30T17:22:42+5:302021-09-30T17:30:56+5:30

Bigg Boss 15 Final Contestant Tejasswi Prakash : टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

9 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षाच्या मुलीच्या लग्नावर आधारित टेलिव्हिजनची वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’मध्ये दिसलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला तुम्ही ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही पाहिलं. आता ही तेजस्वी सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’मध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार आहे.

तेजस्वीने 10 वर्षांपूर्वी ‘2612’ या शोद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत एन्ट्री मारली होती. यानंतर संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता, कर्णसंगिनी अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. रोहितची ती फेवरेट कंटेस्टंट बनली होती.

तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड व ग्लॅमरस फोटो तुूम्हाला दिसतील.

तेजस्वीच्या ‘पहरेदार पिया की’ हा शो चांगलाच वादात सापडला होता. या शोवर लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यावर तो बंद करण्यात आला होता.

तेजस्वी ही इंजिनिअर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीतून तिने इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

बिग बॉस 15 मध्ये सर्वात आधी प्रतीक सहजपालचे नाव कन्फर्म झाले आहे. याशिवाय बिग बॉस 13चा रनरअप राहिलेला आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज, बिग बॉस ओटीटीची फायनलिस्ट शमिता शेट्टी व निशांत भट हेही या सीझनमध्ये दिसणार आहेत.