Top-10 Firms Market Cap: Reliance च्या गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, एका आठवड्यात कमवले 71000 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 02:06 PM2022-12-04T14:06:45+5:302022-12-04T14:09:26+5:30

Top-10 Firms Market Cap: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

Share Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फायदा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना झाला. आठवडाभरातच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत करोडोंची वाढ झाली.

पीटीआयच्या मते, गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,15,837 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कमाईच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे, तर HUL आणि TCS यांनीदेखील त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी प्रचंड नफा कमावला आहे. यादीत समाविष्ट असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी फक्त HDFC बँक आणि HDFC च्या MCap मध्ये घसरण झाली.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 574.86 अंकांनी किंवा 0.92 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यातच बुधवारी सेन्सेक्स निर्देशांकाने प्रथमच 63,000 चा टप्पा ओलांडून विक्रम केला. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजार मूल्यानुसार टॉप-10 कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि अदानी एंटरप्रायझेस यांचा क्रमांक लागतो.

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने आपल्या गुंतवणूकदारांना एका आठवड्यात 71,000 कोटी रुपयांहून अधिकचा नफा कमावून दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (RIL MCap) 71,462.28 कोटी रुपयांनी वाढून 18,41,994.48 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांना लाभ देण्याच्या बाबतीतही पुढे आहे. त्यांच्या मार्केट कॅपमध्ये 18,491.28 कोटी रुपयांची वाढ होऊन 6,14,488.60 कोटी रुपये झाली. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS MCap) चा MCap वाढून रु. 12,58,439.24 कोटी झाला आणि त्यांच्या भागधारकांनी रु. 18,441.62 कोटी कमावले.

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनीही मोठी कमाई केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 3,303.5 कोटींनी वाढून रु. 6,89,515.09 कोटी, अदानी एंटरप्रायझेसचे MCap रु. 2,063.4 कोटींनी वाढून रु. 4,47,045.74 कोटी आणि Bharti Airtel चे मार्केट कॅप रु. 1,140.46 कोटींनी वाढून 4,72, 4.72 कोटी आणि आयसीआयसीआय बँकेचा एमकॅप 845.21 कोटी रुपयांनी वाढून 6,49,207.46 कोटी रुपयांवर पोहोचला.

गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार मूल्य 89.25 कोटी रुपयांनी वाढून 5,42,214.79 कोटी रुपये झाले. मात्र, या काळात एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीचे बाजार भांडवल 5,417.55 कोटी रुपयांनी घसरून 8,96,106.38 कोटी रुपये झाले. दुसरीकडे, एचडीएफसी लिमिटेडचे ​​मार्केट कॅप 2,282.41 कोटी रुपयांनी घसरले आणि ते 4,85,626.22 कोटी रुपयांवर आले.