पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 07:41 PM2024-05-19T19:41:23+5:302024-05-19T19:42:44+5:30

Himachal Lok Sabha Election 2024: कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Kangana Ranaut has said that she wants to win the Best Member of Parliament award in politics after the Padma Shri award | पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

Kangana Ranaut News : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभेच्या रिंगणात असून, त्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा लढत आहे. भारतीय जनता पार्टीने कंगना यांना लोकसभेचे तिकीट दिले. कंगना ह्या अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या कंगना यांनी पद्मश्रीसारख्या नामांकित पुरस्काला गवसणी घातली आहे. पण, आता राजकारणात पाऊल ठेवताच त्यांनी 'बेस्ट एमपी'चा पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न बाळगले आहे. 

राजकारणात आल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करताना कंगना म्हणाल्या की, मला असे वाटते की, आतापर्यंत मी जे काही पुरस्कार जिंकले आहेत, ते मग राष्ट्रीय पुरस्कार असो किंवा पद्मश्री पुरस्कार... पण, भविष्यात मला 'एमपी ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला तर मला खूप आनंद होईल. आमच्या पक्षात किंवा पक्षाच्या आश्वासनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीला खूप गांभीर्याने घेतले जाते. मला वाटत नाही की इतर पक्षांकडे आमच्यासारखे कठोर प्रोटोकॉल आहेत. कंगना यांच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्या त्यांच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात झळकणार आहे. खरे तर हा चित्रपट आधी १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण निवडणुकीमुळे कंगना यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या इतर राज्यांमध्ये देखील भाजपचा प्रचार करत आहेत. दरम्यान, २०२२ च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा थोडक्यात पराभव झाला होता. अशा स्थितीत राज्याचेही नुकसान झाले. आता ही चूक जनतेने पुन्हा करू नये. मोदींच्या गॅरंटीवर आज संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्याला पंतप्रधान मोदींसोबत डावीकडे किंवा उजवीकडे नाही तर सरळ चालायचे आहे, असेही कंगना यांनी सांगितले.

Web Title: Kangana Ranaut has said that she wants to win the Best Member of Parliament award in politics after the Padma Shri award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.