RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण

7-7 षटकांचा हा सामना होणार होता आणि १०.४५ ला मॅच सुरू होणार होता, परंतु टॉसनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मॅच रद्द केली गेली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:55 PM2024-05-19T22:55:40+5:302024-05-19T22:56:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, RR vs KKR Live Marathi : The game has been abandoned, KKR VS SRH IN THE QUALIFIER ON TUESDAY & RCB VS RR IN THE ELIMINATOR ON WEDNESDAY, check playoffs schedule | RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण

RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, RR vs KKR Live Marathi : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला. पावणे नऊ वाजता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आले होते, परंतु काहीवेळातच पुन्हा वीजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. १०.१५ वाजता कव्हर्स काढून मैदान सुकवण्याचं काम सुरू झालं. १०.२५ ला खेळपट्टीची पाहणी केली गेली. KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 7-7 षटकांचा हा सामना होणार होता आणि १०.४५ ला मॅच सुरू होणार होता, परंतु टॉसनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मॅच रद्द केली गेली. 


RR ला क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. तेच KKR ने १९ गुणांसह क्वालिफायर १मधील जागा पक्की केली आहे. SRH ने त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे आणि RR वरील दडपण वाढवले होते. पहिल्या ८ सामन्यांत ७ विजय मिळवून राजस्थानने लीगची सुरुवात दणक्यात केली होती, परंतु मागील चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आणि त्यांची गाडी अडकली. १४ सामन्यांत ८ विजय मिळवून १७ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कारण सनरायझर्स हैदराबादचा नेट रन रेट हा ०.४१४ असा असल्याने ते क्वालिफायर १ साठी पात्र ठरले. 

प्ले ऑफचं वेळापत्रक
२१ मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर १)
२२ मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
२४ मे - क्वालिफायर १ मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर २)
२६ मे - क्वालिफायर १ मधील विजेता संघ वि. क्वालिफायर २ विजेता, चेन्नई ( फायनल) 
Image

Web Title: IPL 2024, RR vs KKR Live Marathi : The game has been abandoned, KKR VS SRH IN THE QUALIFIER ON TUESDAY & RCB VS RR IN THE ELIMINATOR ON WEDNESDAY, check playoffs schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.