१३८ वर्षांपूर्वी कोलकात्यातून सुरुवात, छोट्या क्लिनिकमधून घराघरात पोहोचला 'डाबर' ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 09:35 AM2023-08-22T09:35:18+5:302023-08-22T09:56:22+5:30

डाबरचा एखादा प्रोडक्ट तरी तुमच्या घरात नक्कीच सापडेल. डाबर या नावामागेही आहे रंजक कहाणी.

डाबरचा एखादा प्रोडक्ट तरी तुमच्या घरात नक्कीच सापडेल. डाबरचा मध असो की च्यवनप्राश... ही नावे भारतीयांसाठी नवी नाहीत. हे नाव तुमच्या आणि आमच्या घरात वर्षानुवर्षे वापरलं जात आहे.

आजही अनेक परदेशी कंपन्यांच्या तुलनेत लोकांचा डाबरवर अधिक विश्वास दिसून येतो. यावरूनच तुम्ही त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधू शकता. आज कोट्यवधींची कंपनी असलेली डाबर एकेकाळी एका वैद्यांच्या छोट्या क्लिनिकमधून सुरू झाली.

तो १९८४ चा काळ होता. त्यावेळी देशात कॉलरा आणि मलेरियासारखे आजार पसरले होते. कोलकाता येथे राहणारे आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. एस.के. बर्मन त्यांच्या छोट्याशा दवाखान्यात लोकांना आयुर्वेदिक उपचार देत असत. आयुर्वेदाच्या मदतीनं तो कॉलरा आणि मलेरिया बरा करण्यासाठी लोकांना मदत करत होते.

त्याचे उपचार लोकांवर प्रभावी ठरत होते. या रोगांशी लढण्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक औषधही बनवलं, ज्याचा लोकांना खूप उपयोग झाला. इथूनच डाबरची सुरुवात झाली. ते स्वतः औषधे तयार करून सायकलवर विकत असत.

त्याचे उपचार लोकांवर प्रभावी ठरत होते. या रोगांशी लढण्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक औषधही बनवलं, ज्याचा लोकांना खूप उपयोग झाला. इथूनच डाबरची सुरुवात झाली. ते स्वतः औषधे तयार करून सायकलवर विकत असत.

'डाबर' या नावामागेही एक रंजक कथा आहे. बंगाली भाषिक लोक त्यांना डॉक्टर ऐवजी डाक्टर म्हणायचे. त्यांनी डाक्टरमधला 'डा' आणि बर्मनमधला 'बर' घेऊन ब्रँडला डाबर नाव देण्याचा निर्णय घेतला. डॉ.एस.के.बर्मन हे स्वतःच्या हातानं हर्बल उत्पादनं बनवत असत. लोकांना त्यांची उत्पादनं इतकी आवडली की त्यांना नंतर स्वत:ची फॅक्ट्री सुरू करावी लागली.

डॉ. एस के बर्मन यांनी १९०७ मध्ये सर्व सूत्रं आपले सुपुत्र सी.एल. बर्मन यांच्या हाती सोपवली. त्यांनी यात तेजीनं वाढही केली. डाबर रिसर्च लॅबच्या सुरुवातीसोबतच त्यांनी डाबरच्या प्रोडक्ट्सचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

कामाचा विस्तार तेजीनं होत होता. त्यामुळे त्यांनी आपली कंपनी कोलकात्याहून दिल्लीला आणली. १९७२ ममध्ये साहिबाबादमध्ये डाबरची मोठी फॅक्ट्री, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलं.

कंपनीचा नफा झपाट्याने वाढत होता. एकेकाळी छोट्याशा दवाखान्यात ज्याची सुरुवात झाली, त्याचा देशात आणि जगात विस्तार होऊ लागला. १९९४ मध्ये, डाबरनं त्यांचा IPO लॉन्च करून शेअर बाजारात प्रवेश केला. डाबरची लोकप्रियता इतकी होती की IPO २१ पट ओव्हरसबस्क्राइब झाला होता.

कंपनी सतत आपली उत्पादन श्रेणी वाढवत होती. डाबर हजमोला, डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर होनिटस, डाबर पुदिन हारा, डाबर लाल तेल, डाबर आमला, डाबर रेड पेस्ट, रियल ज्यूस आणि वाटिका यासारखी अनेक उत्पादनांसह त्यांची यादी वाढतच होती. १९९६ मध्ये त्यांना आपले प्रोडक्ट तीन भागांमध्ये विभागावे लागले. डाबर हेल्थकेअर, फॅमिली प्रोडक्ट आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट या श्रेणींमध्ये विभागणी करून त्याचा विस्तार होऊ लागला.

१९९८ मध्ये बर्मन कुटुंबानं कंपनीच्या सीईओ पदावर कुटुंबातील व्यक्तीच्या ऐवजी एका बाहेरील व्यक्तीची निवड केली. कंपनीची सूत्रं पहिल्यांदाच कुटुंबाच्या हातून जाऊन प्रोफेशनल्सच्या हाती सोपवण्यात आली. याचा फायदा कंपनीलाही मिळाला.

२००० मध्ये पहिल्यांदा कंपनीचा टर्नओव्हर १ हजार कोटी रूपयांच्या पार गेला. पुढील पाच वर्षांत कंपनीचं मार्केट कॅप २ अब्ज डॉलर्सच्या पार गेलं. कंपनीनं ओडोनिल, फेम केअर फार्मा, होबी कॉस्मेटिक सारख्या कंपन्यांचं अधिग्रहण केलं आणि त्यांचा विस्तारही केला.