Reliance Jio सोबत डील होताच 'या' शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, फक्त 5 दिवसांत दिला कोट्यवधींचा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:53 PM2022-08-06T17:53:23+5:302022-08-06T18:03:03+5:30

या डीलनंतर कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली आहे...

शेअर बाजारात काही शेअर्स अगदी कमी काळात प्रचंड नफा देऊन जातात. तसेच, जर बिझनेसच्या दृष्टीने एखादी चांगली डील झाली तर, अनेक शेअर्स एकदमच वर येतात. सध्या शेअर बाजारात काहीसे असेच चित्र एका शेअरच्या बाबतीत बघायला मिळत आहे.

रिलायन्स जिओने नुकती एका कंपनीसोबत मोठी डील केली आहे. या डीलनंतर त्या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली आहे. एवढेच नाही, तर त्या कंपनीच्या शेअर्सनी केवळ पाचच दिवसांत 65 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

यो दोन्ही कंपन्यांत झालेला हा करार अथवा ही डील 5G च्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची मानली जात आहे. तसेच, येणाऱ्या काही दिवसांत जिओ 5G सर्व्हिसदेखील लॉन्च करणार आहे.

रिलायन्स जिओने (Jio) नुकताच सुबेक्स (Subex) कंपनीसोबत एक करार केला आहे. सुबेक्स टेलिकॉम ही अॅनालिटिक्स सोल्यूशन्स आणि कम्यूनिकेशन सेवा पुरवणाऱ्यांसाठी एआयच्या नेतृत्वातील डिजिटल ट्रस्ट उत्पादनांशी संबंधित कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच भागीदारी केली आहे. तेव्हापासूनच Subex च्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तसेच, लोकांना कोट्यवधींचा नफाही झाला आहे.

या भागीदारी अंतर्गत Jio Platforms (JPL)ने आपल्या इंडियन टेक्नॉलॉजी एआय ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म (AI Orchestration Platform) 'हायपरसेन्स'साठी (HyperSense) Subex सोबत भागीदारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम व्यवसायातील 5G प्रोडक्ट लाइन वाढविणे, असा या भागीदारीमागचा उद्देश आहे.

शेअर्समध्ये तेजी - खरे तर या भागीदारीपासूनच Subex चा शेअर आकाशाला भिडला आहे. आणि केवळ 5 दिवसांतच या शेअरने 65 टक्के एवढा परतावा दिला आहे. 1 ऑगस्टला NSE वर Subex च्या शेअरची किंमत जवळपास 26.60 रुपये एवढी होती. मात्र, यानंतर या शेअरने रॉकेट स्पीड घेतला आहे. आता 5 ऑगस्टला Subex Share ची किंमत 43.90 रुपये एवढी झाली आहे. तसेच या शेअरची 52 आठवड्यांतील निच्चांकी किंमत 18.60 रुपये तर उच्चांकी किंमत 61.90 रुपये एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)