Multibagger Stocks 2022: 'या' 5 शेअर्सनी फक्त एका वर्षात दिला पम्पर परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 05:37 PM2022-11-28T17:37:21+5:302022-11-28T17:47:05+5:30

शेअर बाजारात काही शेअर्स आहेत, ज्यांनी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.

शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष अत्यंत चढउताराचे राहिले. युक्रेन आणि रशिया यांच्यात झालेल्या युद्धारम्यान स्‍टॉक मार्केट खाली आले. यानंतर, बाजारात तेजी आली. मात्र आरबीआयकडून (RBI) रेपो रेट वाढविला गेल्यानंतर बाजार पुन्हा कोसळू लागला. पण सध्या बाजार र‍ेकॉर्ड हाईवर आहे. यातच असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.

अदानी पॉवरने (Adani Power) वर्ष 2022 मध्ये चांगला परतावा दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 107 रुपये एवढी होती. मात्र, आता तो 330 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात यात 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. 52 आठवड्यांदरम्यान या शेअरने 432.80 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. या दरम्यान शेअरचा लो लेव्हल 93.60 रुपयांवर होता.

अदानी ग्रुपची आणखी एक कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्सनी या वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 1,700 रुपयांवर होती. आता तो 3915.40 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 52 आठवड्यांदरम्यान या शेअरने 4,098.10 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. या दरम्यान, स्टॉकची निचांकी पातळी 1,529.55 रुपये एवढी होती.

एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेडच्या शेअर्सनी या वर्षात 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. जानेवारी 2022 मध्ये या शेअरची किंमत 215 रुपये होती. पण सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 485 रुपयांवर व्यवहार करत आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची निचांकी पातळी 248.85 रुपये आहे आणि उच्च पातळी 566.50 रुपये आहे.

श्री रेणुका शुगर्सचा (Sri Renuka Sugar) शेअर सोमवारी 2 टक्क्यांनी वाढून 59.30 रुपयांवर पोहोचला. वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर रु.28 च्या आसपास व्यवहार करत होता. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. स्टॉकच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी संदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरची नीचांकी पातळी 24.45 रुपये आहे. तर, उच्च पातळी 68.70 रुपये एवढी आहे.

वर्षाच्या सुरुवातीला 382 रुपयांवर व्यवहार करणारा दीपक फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा (Deepak Fertilisers & Petrochemicals Corporation Ltd.) शेअर सोमवारी 816 रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 350.40 रुपये एवढी आहे. तर उच्च पातळी 1,061.70 रुपये एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)