Rakesh Jhunjhunwala यांचा धमाका; Tata सह ‘या’ २ शेअरमधून तब्बल ८६१ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:03 PM2022-03-18T14:03:37+5:302022-03-18T14:09:58+5:30

राकेश झुनझुनवाला यांनी केवळ एका दिवसात तब्बल ८६१ कोटींची नफा कमावल्याचे सांगितले जात आहे. तुमच्याकडे आहेत का ते शेअर?

अद्यापही सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा थेट परिणाम जगासह भारतावरही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलापासून ते सोने-चांदीपर्यंत अनेक गोष्टींनी उच्चांकी दर गाठला आहे. शेअर मार्केटवरही याचा प्रभाव पाहायला मिळाला.

शेअर बाजाराचे बिग बूल अशी ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांना मात्र शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा मोठा लाभ मिळाल्याचे सांगितले जात आहे. केवळ दोन शेअरच्या बळावर राकेश झुनझुनवाला यांनी तब्बल ८६१ कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्या या कमाईत टायटन आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स या दोन कंपनीच्या शेअर्सचे मोठे योगदान दिसून आले. टायटनच्या शेअरची किंमत 2587.30 रुपयांवरून 2706 रुपयांपर्यंत वाढली, म्हणजेच शेअरमध्ये प्रति शेअर 118.70 ची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, Rakesh Jhunjhunwala यांचा पाठिंबा असणाऱ्या स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 608.80 रुपयांवरून 641 रुपये प्रति शेअर झाली, जी प्रति शेअर 32.20 रुपयांनी वाढली. या दोन शेअरमुळे राकेश झुनझुनवाला यांची कमाई 861 कोटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,57,10,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 4.02 टक्के आहे. त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत टायटनचे 95,40,575 शेअर्स आहेत.

Jhunjhunwala दाम्पत्याकडे टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीत 4,52,50,970 कंपनीचे शेअर्स म्हणजेच 5.09 टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला यांनी घोषित केले आहे की, त्यांच्याकडे 10,07,53,935 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 17.50 टक्के आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,52,50,970 शेअर्स आहेत आणि टायटनच्या शेअरची किंमत 118.70 रुपयांवर पोहोचली. तर, राकेश झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीत अंदाजे 537 कोटींची वाढ झाली आहे.

याप्रमाणे Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे स्टार हेल्थचे 10,07,53,935 शेअर्स आहेत, जे 32.20 रुपयांनी वाढले. त्यामुळे, स्टार हेल्थच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या निव्वळ संपत्तीत अंदाजे 324 कोटींची वाढ झाली आहे.

टायटन आणि स्टार हेल्थच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राकेश झुनझुनवालाच्या एकूण संपत्तीत अंदाजे 861 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे.