Kotak Mahindra नं 'या' पेमेंट बँकेतून हिस्सा विकण्याची केली घोषणा; २९४ कोटींना झाली डील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:46 PM2021-08-31T16:46:37+5:302021-08-31T16:53:11+5:30

Kotak Bank नं पेमेंट बँकेतील ८.५७ टक्के हिस्सा विकण्याचा घेतला निर्णय. या निर्णयानंतर कोटक बँकेच्या शेअर्सची झाली जबरदस्त खरेदी.

कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) एअरटेल पेमेंट्स बँकेत (Airtel Payments Bank) ८.५७ टक्के भागविक्रीची घोषणा केली आहे. या बातमी दरम्यान, कोटक बँकेच्या शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं.

एअरटेल पेमेंट बँकचे (APBL) चे २० कोटी शेअर्स भारती एंटरप्रायझेस लिमिटेडला २९४ कोटी रूपये किंवा त्याहून अधिक रुपयांना विकणार असल्याची माहिती कोटक महिंद्रा बँकेकडून देण्यात आली आहे.

एपीबीएलमध्ये कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या २० कोटी इक्विटी शेअर्सच्या (८.५७ टक्के भाग) निर्गुंतवणुकीसाठी बँकेनं एक शेअर खरेदी करार केला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

२०१६ आणि २०१७ दरम्यान २०० कोटीी रूपयांच्या गुंतवणूकीद्वारे हे शेअर्स मिळवले असल्याचं कोटक महिंद्रा बंकेनं शेअर बाजाराला माहिती देताना सांगितलं. ही संपूर्ण प्रक्रिया १५ सप्टेंबर किंवा त्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एअरटेल पेमेंट्स बंकेनं २३ नोव्हेंबर २०१६ पासून बँकेच्या रूपात आपलं कामकाज सुरू केलं होतं. कंपनीचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान ६२७.१९ कोटी रूपये इतका होता. या माहितीनंतर कोट महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये एका टक्क्यापेक्षा अधिक तेजी दिसून आली.

कोटक महिंद्रा बँकेचा शेअर १७५० रूपयांपेक्षा अधिकवर होता. तर एअरटेलच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमामात तेजी दिसून आली. एअरटेलच्या शेअर्सच्या किंमतीत २ टक्क्यांची वाढ झाली आणि तो ६३५ रूपयांवर पोहोचला होता.