शुभ रवि योग: ६ राशींवर दत्तगुरुंची कृपा, कामे सहज पूर्ण होतील; पदोन्नतीची संधी, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:00 AM2024-02-01T07:00:07+5:302024-02-01T07:00:07+5:30

फेब्रुवारीची सुरुवात ६ राशींसाठी उत्तम फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अनेकविध शुभ योग जुळून आले आहेत. रवि योग, चित्रा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच ०१ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करणार आहे.

सूर्य आणि चंद्र यांच्या नक्षत्रातील स्थितीवरून रवि योग जुळून येतो. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात गुरुवारी होत आहे. गुरुवार या वारावर गुरु ग्रहाचा अंमल असतो, असे सांगितले जाते. तसेच श्रीविष्णू आणि दत्तगुरूंची कृपा गुरुवारचे व्रत केल्यास लाभू शकते. याशिवाय गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव वाढून, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात ६ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक आणि चांगल्या संधी मिळणारी ठरू शकते, असे सांगितले जात आहे. करिअर, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडी यासह जीवनातील अन्य आघाड्यांसाठी यश-प्रगतीची दारे खुली होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: पैसे कमविण्याची आणि बचत करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. अधिकारी वर्ग कामावर खूप खुश होतील. ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. जोडीदाराची अपेक्षा, इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर चांगला नफा मिळेल. घरात शांतता आणि आनंद राहील. मुलांच्या संगतीकडे लक्ष देणे हिताचे ठरू शकेल.

मिथुन: नशिबाची साथ मिळेल. कामे सहज पूर्ण होतील. सामाजिक आदरही मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन लोक भेटतील. बुद्धीने आणि विवेकाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

कन्या: मानसिक शांतता लाभू शकेल. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल. नोकरदारांना कालावधी अनुकूल आहे. कामात येणाऱ्या अडचणींबद्दल सहकाऱ्यांशी बोलावे लागेल. पदोन्नतीसाठी विचार होऊ शकतो. एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचे सहकार्य मिळेल.

तूळ: नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकते. काही नवीन मित्रही बनवू शकता. परदेशात काम करण्याची संधी मिळेल. राजकारणात काम करणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. नवीन व्यवसायात किंवा शेअरमध्ये पैसे गुंतवू शकता, ज्यामध्ये आर्थिक लाभही मिळू शकतो. लोकप्रियता वाढेल. दीर्घकालीन प्रलंबित बाबींना गती मिळेल. विश्वासार्हता आणि आदर वाढेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धीमुळे मन प्रसन्न राहील.

धनु: एखादे मोठे यश मिळू शकते. काही महत्त्वाच्या कामांमध्ये पूर्ण लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा उंचावू शकेल. प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळू शेकल. आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी चांगल्या विचारसरणीचा फायदा होऊ शकेल. मुलाच्या प्रगतीत काही अडथळे असतील तर ते दूर करण्याचा मार्ग मिळू शकेल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुंभ: धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण कराल. प्रवासात काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.