एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral

KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे प्रकरण ताजे असताना रोहितचा आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:45 PM2024-05-17T21:45:00+5:302024-05-17T21:45:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs LSG Live Marathi : please mute the audio, one audio got me in trouble, Rohit Sharma requested to cameraman, Video    | एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral

एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs LSG Live Marathi : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगात असताना KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याची नाराजी जाहीरपणे उघड झाली होती. सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसताच KKR ने तो व्हिडीओ डिलीट केला होता. पण, त्यानंतर बराच काळ चर्चा रंगली होती. हे प्रकरण ताजे असताना रोहितचा आणखी एक व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे. 

KKR च्या लढतीपूर्वी काय बोलला होता?
''एक एक चीज चेंज हो रहा है.. वो उनके उपर है... जो भी है वो मेरा घर है भाई, वो मंदिर जो हैना मैने बनवाया है ( एकेक करून गोष्टी बदलत आहेत. ते त्यांच्यावर आहे. मात्र, भावा ते माझं घर आहे. हे मंदिर मी बांधलं आहे.),''असे रोहित बोलतोय. या व्हिडीओच्या शेवटी रोहित म्हणाला, भाई मेरा क्या मेरा तो ये लास्ट है ( माझं हे शेवटचं वर्ष आहे, तसेही )  

आज लखनौविरुद्धच्या लढतीपूर्वीच्या व्हिडीओत काय?
LSG विरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित त्याचा मित्र धवल कुलकर्णीसोबत गप्पा मारताना दिसतोय.. हे सर्व कॅमेरामन कैद करत असताना रोहितची त्याच्याकडे नजर पडली आणि त्याने हात जोडून त्याला विनंती केली की, ए भाई ऑडिओ बंद कर आधीच एका ऑडिओने माझी वाट लावली आहे. 


आजच्या सामन्यात काय झालं?

निकोलस पूरन व लोकेश राहुल यांच्या १०९ धावांच्या महत्त्वाच्या भागीदारीच्या जोरावर LSG ने ६ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. ३ फलंदाज ६९ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार लोकेश व निकोलस यांनी MI च्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निकोलसने २९ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांच्या आतषबाजीसह ७५ धावा केल्या आणि राहुलसह ४४ चेंडूंत १०९ धावा जोडल्या. लोकेशने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. नुवान तुषाराने २८ धावांत ३, तर पियुष चावलाने २९ धावांत ३ विकेट्स पूर्ण केल्या. तुषाराने १७व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या षटकावर विकेट घेतली, ततर पियुषने १८व्या षटकात विकेट घेऊन संघाची हॅटट्रिक पूर्ण केली.

Web Title: IPL 2024, MI vs LSG Live Marathi : please mute the audio, one audio got me in trouble, Rohit Sharma requested to cameraman, Video   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.