मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 06:18 AM2024-05-18T06:18:36+5:302024-05-18T06:20:16+5:30

पुत्र राहुल यांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक प्रचार सभेला सोनिया गांधी संबोधित करत होत्या. 

i entrust my son to you he will not disappoint you said sonia gandhi | मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

रायबरेली (उत्तर प्रदेश) : ‘मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे. राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत. जसं तुम्ही मला आपलं मानलं, तसंच राहुललाही माना’, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीच्या जनतेला भावनिक साद घातली. पुत्र राहुल यांच्या समर्थनार्थ येथे आयोजित निवडणूक प्रचार सभेला त्या संबोधित करत होत्या. 

‘रायबरेलीसोबत गंगा मातेसारखे पवित्र नाते आहे. हे नाते अवध आणि रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून सुरू झाले आणि ते आजही कायम आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे. इंदिराजींच्या हृदयात रायबरेलीसाठी विशेष कप्पा होता. हे आम्ही जवळून पाहिले आहे. त्यांना तुमच्याबद्दल अपार आपुलकी होती. - सोनिया गांधी,  कॉंग्रेस नेत्या.

रायबरेलीशी आमचे जुने नाते आहे. येथील जनतेने आम्हाला आतापर्यंत बरेच प्रेम दिले, आशीर्वाद दिले. ते पुढेही आम्हाला मिळेल हा विश्वास आहे. उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते हे दोन पक्षांचे कार्यकर्ते नसून एकच सेना आहे. या सेनेच्या बळावर आपल्याला लोकसभेची ही लढाई जिंकायची आहे. - प्रियांका गांधी, कॉंग्रेस नेत्या.

 

Web Title: i entrust my son to you he will not disappoint you said sonia gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.