Tata च्या या SUV वर संपूर्ण देश 'फिदा', किंमत फक्त 7.6 लाख; सनरूफसह मिळतायत हे ढासू फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:15 PM2022-11-08T19:15:12+5:302022-11-08T19:18:57+5:30

सध्या, टाटाच्या या कारची किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होऊन 14.08 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) जाते. ही 5 सीटर एसयूव्ही आहे.

टाटा मोटर्ससाठी नेक्सॉन ही एक यशस्वी कार ठरली आहे. एवढेच नाही, तर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्हीही आहे. महत्वाचे म्हणजे, ऑक्टोबर 2022 मध्ये ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्हीदेखील होती. गेल्या महिन्यात हिच्या एकूण 13,767 युनिट्सची विक्री झाली होती. मात्र, ऑक्टोबरपूर्वी सलग दोन महिने मारुतीची ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात नेक्सॉनने पुन्हा पहिल्या क्रमांक मिळवला आहे. (Tata nexon price and features)

सध्या, टाटा नेक्सॉनची किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होऊन 14.08 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) जाते. ही 5 सीटर एसयूव्ही आहे. नेक्सॉनची स्पर्धा टोयोटा अर्बन क्रूझर, किया सोनेट, महिंद्रा XUV300, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या कारशी आहे.

इंजिन स्पेसिफिकेशन - टाटा नेक्सॉनला पेट्रोल आणि डिझेल, दोन्ही इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यात 1.2-लिटर, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळते, जे 110पीएस पॉवर आणि 170एनएम टॉर्क जनरेट करू शकते. या शिवाय, 1.5-लिटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 110पीएस पॉवर आणि 260एनएम टॉर्क जनरेट करू शकते.

या कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे ऑप्शनदेखील देण्यात आलेहे. टाटा नेक्सॉन (डिझेल) 21.5 किलोमीटर तर पेट्रोल मॉडेल 17.2 किलोमीटरपर्यंतचे मायलेज देऊ शकते. नेक्सॉनचे इलेक्ट्रिक व्हर्जनही येते. टाटा नेक्सॉन ईव्ही देखील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.

फीचर्स - टाटा नेक्सॉनमध्ये 7.0 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. जे अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय, रेन-सेंसिंग वायपर, ऑटो एसी, रिअर एसी वेंट्स, क्रूझ कंट्रोल, सनरूफ आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देखील मिळतात.

सेफ्टी फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, स्टँडर्ड ड्यूअल फ्रंट एअरबॅग मिळतात. याशिवाय, रिअर पार्किंग सेंसर, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रँम (ईएसपी) आणि आयएसऑफिक्स चाइल्ड सीट अँकर सारखे फीचर्सदेखील ऑफर केले जातात. या कारला ग्लोबल एनकॅपने 5 स्टार सेफ्टी रेटिंग दिली आहे.