Honda गाड्यांमध्ये बिघाड; रिकॉल केल्या ७७,९५४ कार, विविध मॉडेल्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 03:10 PM2021-04-17T15:10:00+5:302021-04-17T15:15:14+5:30

होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) ने आपल्या ७७ हजार ९५४ कार रिकॉल केल्या आहेत. यामध्ये विविध मॉडेल्सचा समावेश आहे.

गेली अनेक वर्षे भारतातील कोट्यवधी ग्राहकांच्या मनामध्ये बळकट स्थान निर्माण केलेल्या अनेक कंपन्यांपैकी होंडा हे एक नाव आहे. कार असो वा बाइक होंडाची उत्पादने उच्च गुणवत्ता, श्रेणींची असतात, असे सांगितले जाते.

ऑटोमोबाइल क्षेत्रात होंडाचा दबदबा अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात ऑटोमोबाइल क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहन विक्रीत घसरणच होताना दिसत आहे.

अशातच होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) ने हजारो गाड्या रिकॉल केल्या आहेत. होंडाने आपल्या ७७ हजार ९५४ कार परत मागवल्या आहेत. यामध्ये विविध मॉडेल्सचा समावेश आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, कारच्या फ्यूल पंपमध्ये लावण्यात आलेले इम्पेलर्स खराब होऊ शकते. सोबत इंजिन थांबू शकते. किंवा पुन्हा सुरूच होत नाही. त्यामुळे आता कंपनीने याला बदलण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

ही प्रक्रिया १७ एप्रिल २०२१ पासून सुरू होणार आहे. हा बिघाड टप्प्याटप्याने संपूर्ण भारतात एचसीआयएल डीलरशिपवर मोफत दुरुस्त करून दिला जाणार आहे.

ज्या कार परत बोलावल्या आहेत. त्यात होंडा अमेज, चौथी जनरेशनची सिटी, डब्ल्यूआर-व्ही, जॅज, सिविक, बीआर वी आणि सीआरव्ही याचा समावेश आहे. या कार जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत तयार करण्यात आल्या होत्या.

Honda अमेझचे ३६ हजार ०८६ युनिट्स, चौथी जनरेशनची सिटीचे २० हजार २४८ युनिट्स, व्हीआर-व्हीचे ७ हजार ८७१ युनिट्स रिकॉल करण्यात आले आहेत.

तर, Honda जॅझचे ६ हजार २३५ युनिट्स, सिव्हिकचे ५ हजार १७० युनिट्स, बीआर-व्हीचे १ हजार ७३७ युनिट्स आणि सीआर-व्हीच्या ६०७ युनिट्सचा समावेश आहे.

Honda च्या विविध मॉडेल्सपैकी बिघाड झालेल्या कार ज्या ग्राहकांनी खरेदी केल्या असतील, त्या प्रत्येक ग्राहकाशी कंपनीकडून संपर्क करण्यात येणार आहे. गतवर्षी जून महिन्यात कंपनीने ६५ हजार ६५१ विविध मॉडेल्सच्या कार रिकॉल केल्या होत्या.

दरम्यान, होंडा कार्स इंडियाने एप्रिल मध्ये बैसाखी, उगादी, गुढी पाढवा, बिहू आणि पोइला बैसाख सारख्या सणांनिमित्त ग्राहकांना रोख रकम शिवाय अनेक ऑफर्स दिले आहेत. कंपनीकडून या महिन्याचा अखेरपर्यंत ग्राहकांना सूट देणार आहे. कंपनीकडून ३० एप्रिल पर्यंत होंडा कार्सच्या सर्व डिलरशीपवर हा लाभ मिळणार आहे.