बजाजची नॅनोपेक्षाही छोटी Qute कार आली; पल्सरएवढे मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 03:40 PM2019-04-18T15:40:50+5:302019-04-18T15:44:45+5:30

बजाज ऑटोने आज भारतात सर्वात छोटी कार लाँच केली. ही एवढी छोटी आहे की टाटाची नॅनोही तिच्यासमोर मोठी वाटते. बजाजने या कारचे नाव Qute कार असे ठेवले आहे. महत्वाचे म्हणजे ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे.

बजाज ऑटोने या कारची किंमतही 2.48 लाख पेट्रोल आणि 2.78 लाख रुपये सीएनजी व्हेरिअंटसाठी ठेवण्यात आली आहे. या क्वाड्रीसायकलला खासगी आणि व्यावसायिक वापरासाठीही नोंदणी करता येणार आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या कारचे इंजिन बजाजच्या डॉमिनॉर या मोटारसायकलपेक्षाही कमी क्षमतेचे आहे. बजाजच्या या क्यूट कारमध्ये 216 सीसी सिंगल सिलिंडर लिक्विड कूल DTSi इंजिन देण्यात आले आहे. DTSi हे तंत्रज्ञान बजाजच्या स्कूटरमध्येही वापरले जाते. हे इंजिन 5,500rpm वर 13 बीएचपी ताकद निर्माण करते. तर 4 हजार आरपीएमवर 18.9 एनएम टॉर्क देते. तर सीएनजी व्हेरिअंटमध्ये 5,500rpm मध्ये 11 बीएचपी ताकद देण्यासोबतच 16.1 एनएम टॉर्क देते

बजाजच्या या छोट्याशा कारमध्ये 4 जण बसू शकतात. या कारमध्ये फाईव्ह स्पीड सिक्वेंशिअल मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जास्तीत जास्त वेग 70 किमी आणि 35 किमीचे मायलेज ही कार देणार आहे. तर सीएनजीवर ही कार 43 किमीचे मायलेज देते.

सामान ठेवण्यासाठीही या कारमध्ये चांगली जागा देण्यात आली आहे. या कारच्या बूटमध्ये 20 किलोचे सामान ठेवता येते. तसेच कारवरील कॅरिअरवर 40 किलोचे सामान ठेवता येते.

या छोट्याशा कारची लांबी 2,752 एमएम, रुंदी 1,312 एमएम आणि उंची 1,622 एमएम आहे.