Affordable Scramblers: TVS Ronin ते Royal Enfield Scram; 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त स्क्रॅम्बलर बाइक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:38 PM2022-07-08T19:38:41+5:302022-07-08T19:47:08+5:30

Most Affordable Scramblers: बेनेली, डुकाटी किंवा ट्रायम्फसारख्या कंपन्यांच्या स्क्रॅम्बलर बाइक 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा महाग असतात.

Most Affordable Scramblers In India: टीव्हीएसने त्यांची नवीन रोनिन(Ronin) लॉन्च केल्यामुळे आता परवडणाऱ्या स्क्रॅम्बलर श्रेणीत आणखी एक स्पर्धक आला आहे. जर तुम्ही बेनेली, डुकाटी किंवा ट्रायम्फसारख्या कंपन्यांच्या स्क्रॅम्बलर बाइक घेतल्या, तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. परंतू, देशात आता अनेक स्क्रॅम्बलर बाइक्स उपलब्ध आहेत, ज्या 3 लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतात. आज आम्ही तुम्हाला देशातील 4 सर्वात स्वस्त स्क्रॅम्बलर्स बाइक्सबद्दल सांगणार आहोत.

TVS Ronin – 1.49 लाख रुपये: काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या TVS Ronin मध्ये 225 cc सिंगल-सिलेंडर एअर आणि ऑइल-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे. या गाडीत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन 20 bhp पॉवर आणि 19.9 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या हे इंजिन टीव्हीएसच्या इतर कोणत्याही मोटारसायकलमध्ये वापरण्यात आले नाही. या गाडीची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे.

Royal Enfield Scram 411 – 2.03 लाख रुपये: Royal Enfieldच्या स्क्रॅम 411 मध्ये 411cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल आणि एअर-कूल्ड इंजिन मिळेल. हे इंजिन 24.3bhp पॉवर आणि 32Nm टॉर्क जनरेट करते. यात पुढे 19-इंच आणि मागे 17-इंच व्हील मिळतो. स्क्रॅम 411 रॉयल एनफील्डच्या हिमालयन बाइकवर आधारित आहे. ही गाडी ऑफ-रोडिंगसाठी सक्षम आहे.

Yezdi Scrambler – 2.05 लाख रुपये: Yezdi Scrambler मध्ये 334cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळेल. हे स्क्रैम 411 च्या तुलनेत अधिक पॉवर पण, कमी टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 28.7bhp पॉवर आणि 28.20Nm टॉर्क जनरेट करतो. याचे वजन 182 किग्रा असून, या गाडीत तीन एबीएस मोड-रोड, ऑफ-रोड आणि रेन देण्यात आला आहे.

Honda CB350RS – 2.03 लाख रुपये: Honda CB350RS मध्ये 348.36cc, 4 स्ट्रोक, एसआय, बीएस-VI इंजिन मिळेल, जे 15.5kW @ 5500 rpm पॉवर आणि 30N-m @ 3000 rpm टॉर्क जनरेट करेल. यात डुअल चैनल ABS मिळेल. यासोबतच पुढे 310mm डिस्क आणि मागे 240mm डिस्क मिळतो.