उन्हाच्या तडाख्यात परभणीत आगीचे सत्र; गोडाऊनमधील साहित्य जळाले, टँकरनेही घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:07 IST2026-05-02T18:06:15+5:302026-05-02T18:07:00+5:30

अग्निशमन दलाने ६ तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या आगींवर मिळवले नियंत्रण

Two Separate Fire Incidents Reported in Parbhani; Godown and Tar Tanker Catch Fire | उन्हाच्या तडाख्यात परभणीत आगीचे सत्र; गोडाऊनमधील साहित्य जळाले, टँकरनेही घेतला पेट

उन्हाच्या तडाख्यात परभणीत आगीचे सत्र; गोडाऊनमधील साहित्य जळाले, टँकरनेही घेतला पेट

परभणी: परभणी शहरात शनिवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या असून यामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. पहिली घटना शहरातील अपणा कॉर्नर भागातील मरकज मस्जिद जवळ घडली, तर दुसरी घटना जिंतूर रोडवरील दत्तनगर परिसरात समोर आली आहे.

गोडाऊनला आग अन् धुराचे लोट
अपणा कॉर्नर भागातील एका बंद गोडाऊनला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. उपमहापौर गणेश देशमुख यांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीत गोडाऊनमधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले आहे.

बंद टँकरचा भडका
दुसरी घटना सायंकाळी ४ वाजता जिंतूर रोडवरील दत्तनगर भागात घडली. येथे बंद स्थितीत असलेल्या डांबर वाहतूक करणाऱ्या टँकरने (क्र. MH 22 AA 7569) अचानक पेट घेतला. मदन जाधव आणि इनायत अली यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Web Title : परभणी में आग का कहर: गोदाम खाक, गर्मी में तारकोल टैंकर में आग

Web Summary : परभणी में दो बड़ी आग की घटनाएं हुईं। अपना कॉर्नर के पास एक गोदाम और जिंतूर रोड पर एक स्थिर तारकोल टैंकर में आग लग गई। दमकल कर्मियों ने दोनों आगों को बुझा दिया, जिससे कोई हताहत नहीं हुआ, हालांकि गोदाम को काफी नुकसान हुआ।

Web Title : Parbhani Firestorm: Godown Gutted, Tar Tanker Ablaze Amidst Heatwave

Web Summary : Two major fire incidents struck Parbhani. A godown near Apna Corner and a stationary tar tanker on Jintur Road caught fire. Firefighters extinguished both blazes, preventing casualties, though the godown suffered significant damage.