थरार! परभणीत धावत्या कारने घेतला पेट, प्रवासी उतरले अन् काही क्षणात झाला स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:33 IST2026-05-13T19:31:57+5:302026-05-13T19:33:07+5:30

मानवत-परभणी महामार्गावर कारचा भीषण स्फोट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५ प्रवाशांचे प्राण वाचले

Thrill! A running car caught fire in Parbhani, passengers got off and an explosion occurred within moments | थरार! परभणीत धावत्या कारने घेतला पेट, प्रवासी उतरले अन् काही क्षणात झाला स्फोट

थरार! परभणीत धावत्या कारने घेतला पेट, प्रवासी उतरले अन् काही क्षणात झाला स्फोट

मानवत/ ताडबोरगाव : परभणी -मानवत राष्ट्रीय महामार्गावरील ताडबोरगाव जवळ बुधवारी सायंकाळी थरारक घटना घडली. एका धावत्या कारने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून कार थांबवत प्रवाशांना खाली उतरविले अन् काही क्षणातच कारचा स्फोट झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जामखेड येथून परभणीकडे एका विवाह सोहसोहळ्यासाठी कार क्रमांक (एम.एच. १४ एन. ए. १७२८) सीएनजी कार जात होती. दरम्यान सायंकाळी ५ च्या सुमारास ताडबोरगाव फाट्याजवळ आली असता, अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघू लागला. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक आकाश फाळके यांनी कार रस्त्याच्या कडेला घेतली. तात्काळ कारमधील पाचही प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. 

गाडीचा स्फोट 
चालकाने तातडीने गाडीतील पाचही प्रवाशांना बाहेर काढले. प्रवासी सुरक्षित अंतरावर जाताच काही वेळातच कारमधील सीएनजी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने काही मिनिटांतच संपूर्ण गाडीचा सांगाडा झाला. भररस्त्यात लागलेल्या या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Web Title : परभणी: चलती कार में लगी आग, यात्री सुरक्षित, हाईवे पर हुआ विस्फोट

Web Summary : महाराष्ट्र के परभणी के पास राजमार्ग पर एक कार में आग लग गई। सीएनजी सिलेंडर में विस्फोट से पहले यात्री बच गए, जिससे वाहन नष्ट हो गया। यातायात बाधित हुआ, लेकिन कोई घायल नहीं हुआ। कार शादी समारोह के लिए जा रही थी।

Web Title : Parbhani: Car Catches Fire, Passengers Escape, Explosion Follows on Highway

Web Summary : A car caught fire near Parbhani, Maharashtra, on the highway. Passengers escaped moments before a CNG cylinder explosion destroyed the vehicle. Traffic was briefly disrupted, but no injuries were reported. The car was en route to a wedding.