डोक्यात गट्टू मारून पत्नीचा खून; प्रत्यक्षदर्शी जावेच्या साक्षीवरुन नराधम पतीला अजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:26 IST2026-05-02T19:25:05+5:302026-05-02T19:26:13+5:30

यामध्ये एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयताची जाऊ हिची साक्ष महत्त्वाची ठरली.

Parbhani Court Sentences Husband to Life Imprisonment for Wife's Murder with Concrete Block | डोक्यात गट्टू मारून पत्नीचा खून; प्रत्यक्षदर्शी जावेच्या साक्षीवरुन नराधम पतीला अजन्म कारावास

डोक्यात गट्टू मारून पत्नीचा खून; प्रत्यक्षदर्शी जावेच्या साक्षीवरुन नराधम पतीला अजन्म कारावास

-राजन मंगरुळकर
परभणी :
पत्नीसोबत वाद करून राहत्या घरामध्ये तिच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना नानलपेठ हद्दीत सन २०२२ मध्ये घडली होती. या प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश-२ एन.पी.त्रिभुवन यांनी शनिवारी निकाल दिला. पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी पतीस अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शेषेराव रामराव प्रधान (४८, रा.महात्मा गांधी नगर, धार रोड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. चेतन लाटे यांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची बहिण मंगल हिचे लग्न शेषराव प्रधान यांच्यासोबत १९ वर्षांपूर्वी झाले होते. शेषराव याला त्याची दुसरी पत्नी छाया हिने सोडून दिल्याने तिने पोटगी व इतर दावे दाखल केल्यामुळे पोटगीची रक्कम भरण्यासाठी विकास नगर येथील प्लॉट विकून पोटगी भरण्यासाठी पती तगादा लावत होता. १७ ऑगस्टला शेषेराव प्रधान याने पत्नी मंगल हिच्यासोबत वाद करून राहत्या घरात तिच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केला होता. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी केला. आरोपी शेषेराव प्रधान याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ एन.पी. त्रिभुवन यांच्यासमोर अंडर ट्रायल हा खटला चालला. 

यामध्ये एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयताची जाऊ हिची साक्ष महत्त्वाची ठरली. तिने संपूर्ण घटना पाहिली व आरोपीस प्रतिबंध केला असता आरोपीने तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश त्रिभूवन यांनी आरोपी शेषेराव प्रधान यास भादवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून अजन्म कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनात नितीन खळीकर यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, हनुमान तांदळे, वंदना आदोडे, सचिन धबडगे यांनी काम पाहिले.

Web Title : पत्नी की हत्या के लिए पति को आजीवन कारावास।

Web Summary : परभणी में, एक व्यक्ति को 2022 में सीमेंट के ब्लॉक से अपनी पत्नी की हत्या करने के लिए आजीवन कारावास की सजा सुनाई गई। पीड़िता की भाभी की प्रत्यक्षदर्शी गवाही दोषसिद्धि सुनिश्चित करने में महत्वपूर्ण थी।

Web Title : Husband gets life for murdering wife with cement block.

Web Summary : In Parbhani, a man was sentenced to life imprisonment for murdering his wife with a cement block in 2022. The eyewitness testimony of the victim's sister-in-law was crucial in securing the conviction.