Parbhani: CCTV lump with bank safe | परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास

परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील रकमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ९५ हजार ३७५ रक्केचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लंपास केला. या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची डासाळा येथे शाखा आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बॅकेचे शॅटर उचकावून मध्ये प्रवेश केला. प्रथम बँॅकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी चक्क तिजोरी तसेच बॅकेतील चार सीसीटीव्ही कॅमेरे त्याचा सीडीआर पळवून नेली. तिजोरीत ८९ हजार ३७५ रुपये रोख रक्कम असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी बॅकेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव यांच्या फियादीवरून चोरट्यांविरूध्द सेलू पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारच्या मध्यरात्रीच तालुक्यातील गुगळी धामणगाव जिल्हा बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. बॅकेच्या बाजूला झोपलेल्या सुनील साडेगावकर यांना आवाज आल्याने ते जागे झाले. आरडाओरडा केल्या नंतर चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी केले जिल्हा बँकेलाच लक्ष...
४वर्षभरापूर्वी सेलू येथील पाथरी रस्त्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दरोडा टाकून सुमारे २५ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. या चोरीचा अद्यापही तपास लागलेला नाही.
४दोन महिन्यांपूर्वी डासाळा शाखेचे व्यवस्थापक आणि रोखपाल दुचाकीवरुन जात असताना चोरट्यांनी भरदिवसा त्यांना देऊळगाव पाटीवर अडवून मारहाण करत दोन लाख रुपये पळविले. या घटनेचा अद्यापही तपास थंड बस्स्त्यात आहे.
४या प्रकरणात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. चोरट्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Parbhani: CCTV lump with bank safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.